भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज सलामीवीर शिखर धवन सध्या संघातून बाहेर आहे. पण लवकरच धवन पुन्हा एखदा भारताच्या जर्सीमध्ये खेळताना दिसू शकतो. माध्यमांतील वृत्तांनुसार शिखर धवनच्या नेतृत्वातील भारतीय संघ संघ एशियन गेम्समध्ये भाग घेऊ शकतो. 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर पर्यंत ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.
माहितीनुसार भारताचा ब संघ एशियन गोम्समध्ये खेळताना दिसणार आहे. या स्पर्धेत भाग घेणारा संघ वनडे विश्वचषकात खेळणार नाहीये. संघाचे नेतृत्व शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्याकडे असेल. एशियन गेम्समध्ये टी-20 क्रिकेट प्रकारात खेळले जाणार असल्यामुळे इंडियन प्रीमियर लीग गाजवणाऱ्या युवा खेळाडूंना या संघात संधी मिळू शकते. यात रिंकू सिंग, तिलक वर्मा, शिवम दुब, आकाश मधवाल, उमरान मलिक आणि पृथ्वी शॉ या खेळाडूंचा समावेश असू शकतो. त्याव्यतिरिक्त धनवसोबत अजिंक्य रहाणे आणि भुवनेश्वर कुमार असे अनुभवी खेळाडूही या स्पर्धेत खेळू शकतात.
शिखर धवन नेहमीच संघाचा महत्वाचा खेळाडू राहिला आहे. त्याने अनेकदा संघाला विजय मिळवून दिला आहे. कर्णधार म्हणूनही त्याचे प्रदर्शन चांगले राहिले आहे. मागच्या वर्षीही भारताचा प्रमुख संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना धवनने श्रीलंका दौऱ्यात संघाचे नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वात भारताने आतापर्यंत 15 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि त्यापैकी 8 सामन्यात संघाला विजय मिळला आहे. 5 सामन्यांमध्ये भारत पराभूत झाला, तर दोन सामन्यांचा निकाल लागू शकला नाही.
कारकिर्दीचा एकंदरीत विचार केला, तर सलामीवीर फलंदाजाने 167 वनडे, 34 कसोटी आणि 68 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 167 वनडे सामन्यांमध्ये धवनने 44.11च्या सरासरीने 6793 धावा केल्या आहेत. यात 17 शतक आणि 39 अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटमध्ये धवनने 34 सामन्यात 40.16च्या सरासरीने 2315 धावा केल्या आहेत. कसोटीत त्याच्या बॅटमधून सात शतके आली आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 68 सामन्यांमध्ये 27.92च्या सरारसीने 1759 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 11 अर्धशतकांचा समावेश आहे. (Shikhar Dhawan may lead the Indian cricket team in the upcoming Asian Games)
महत्वाच्या बातम्या –
डॉ. बाबासाहेब आंबेडकर निमंत्रित हॉकी स्पर्धा । आयकर, क्रीडा प्रबोधिनी संघांचा सफाईदार विजय
एमपीएल अंतिम सामना पाण्यात! शुक्रवारी सकाळी रंगणार निकाली लढत