भारतीय क्रिकेट संघाचा धाकड सलामीवीर शिखर धवन हा सध्या इतर खेळाडूंप्रमाणे इंडियन प्रीमियर लीग २०२१ साठी संयुक्त अरब अमिरातीमध्ये आहे. तिथे तो दिल्ली कॅपिटल्स संघाला पहिलेवहिले जेतेपद मिळवून देण्यासाठी कसून सराव करतो आहे. तत्पूर्वी तो पत्नी आयेशा मुखर्जी हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर चर्चेत आला होता. आयेशाने इंस्टाग्राम पोस्टद्वारे घटस्फोटाची माहिती दिली होती, परंतु धवन अजून उघडपणे यावर बोललेला नाही. आता धवनने त्याचा मुलगा जोरावरसोबत व्हिडिओ कॉलवर संवाद साधला आहे.
धवन नेहमीच आपल्या ७ वर्षीय मुलासोबत मजा-मस्ती करत असतो. यादरम्यानचे फोटोही तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. युएईतून मुलगा जोरावरसोबत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधल्याचा फोटोही त्याने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. या फोटोमध्ये वडील आणि मुलाची ही जोडी एकमेकांना किस करताना दिसत आहे.
धवनने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘माझ्या दिवसाचा सर्वात खास भाग.’ या फोटोवरुन त्यांच्यातील प्रेम स्पष्टपणे दिसून येते.
दुर्दैवाची बाब म्हणजे, भारतीय संघाच्या सर्वोत्कृष्ट सलामीवीरांपैकी एक असलेल्या धवनला टी२० विश्वचषकासाठी संधी मिळाली नाही. कदाचित याचीच निराशा व्यक्त करण्यासाठी त्याने आपला हसतानाचा एक फोटो पोस्ट करत लिहिले होते की, ‘हसत राहिले पाहिजे. हसणे हीच आपली सर्वात मोठी ताकद असते.’
दरम्यान धवन आणि आयेशा यांचे २०१२ साली लग्न झाले होते. मात्र लग्नाच्या ९ वर्षांनंतर त्यांनी घटस्पोट घेतला आहे. आयेशाचे धवनबरोबरच दुसरे लग्न होते. यापूर्वीही तिचा एकदा घटस्पोट झाला आहे. तिला धवनबरोबर लग्न करण्यावेळी दोन मुलीही होत्या. या दोन मुलींचाही धवनने स्विकार केला होता.
आयेशा गेल्या अनेक वर्षांपासून ऑस्ट्रेलियामध्ये राहाते, त्यामुळे शिखर वेळ मिळेल तेव्हा ऑस्ट्रेलियाला जायचा किंवा आयेशा भारतात यायची.
नातं तुटल्याची होती चर्चा
शिखर आणि आयेशा यांच्यात दुरावा आल्याची चर्चा गेल्या वर्षीपासून सुरु होती. कारण, दोघांनीही एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केलं होतं. तसेच त्यांनी एकमेकांबरोबरील पोस्ट टाकणंही बंद केलं होतं. इतकंच नाही, तर आयेशाने इंस्टाग्रामवर तिचे दुसरे अकाउंटही चालू केले होते.
याबरोबर आयेशाची मोठी मुलगी आलियाने देखील शिखर बरोबरील इंस्टाग्रामवर पोस्ट केलेले फोटो डिलिट केले होते. त्याचबरोबर मर्यादीत षटकांच्या मालिकांसाठी शिखर गेल्यावर्षी जेव्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्याला गेला होता, त्यावेळीही तो घरी न जाता थेट भारतात परतला होता. विशेष म्हणजे २२ डिसेंबरला त्याच्या मुलाचा जोरावरचा वाढदिवस होता. असे असतानाही तो घरी गेला नसल्याची चर्चा होती. या सर्व घडामोडींमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून त्याचे आणि आयेशा यांचे नाते बिघडल्याची चर्चा होती.
महत्त्वाच्या बातम्या-
पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर प्रेयसीलाही सोडले, आता ऑसी क्रिकेटरने खरेदी केले ७० कोटींचे ‘बॅचलर घर’
आयपीएल मोहिमेपूर्वी कर्णधार कोहलीचा नवख्या शिलेदाराला व्हॉट्सअप मॅसेज, लिहिले ‘हे’ प्रेरणादायी शब्द
चौदा वर्षांनंतर टीम इंडियाकडे टी२० विश्वचषक जिंकण्याची संधी, पण ‘ही’ ३ कारणे फेरू शकतात पाणी