नर्वस नाईंटीजमध्ये बाद होणे हे खेळाडूसाठी तसे फारच वाईट समजले जातो. क्रिकेटमध्ये शतकी खेळी करण तसेच त्याची संख्या वाढवणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते.
अशा वेळी ९० ते ९९ धावांमध्ये बाद होणे, म्हणजे फलंदाजाला एक सेटबॅक समजला जातो. सचिन तेंडूलकरसारखा खेळाडू वनडेत तब्बल १८ वेळा ९० ते ९९ मध्ये बाद झाला. इतरही अनेक फलंदाज असे बाद झाले आहेत.
परंतु एक असा भारतीय फलंदाज आहे, जो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात कमीत कमी २ वेळा ९० ते ९९ धावांमध्ये बाद झाला आहे. त्याचे नाव शिखर धवन.
शिखर धवन कसोटीत २ वेळा, वनडेत ४ वेळा तर टी२०मध्ये २ वेळा ९० ते ९९ दरम्यान बाद झाला आहे.
कसोटीत तो ९८ धावांवर न्यूझीलंडविरुद्ध व ९४ धावांवर श्रीलंकेविरुद्ध बाद झाला आहे. टी२०मध्ये तो ९० धावांवर श्रीलंकेविरुद्ध व ९२ धावांवर वेस्ट इंडिजविरुद्ध बाद झाला आहे. गमतीचा भाग म्हणजे शिखरच्या नावावर एकही टी२० शतक नाही.
तसेच वनडेत तो ९५ धावांवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध, ९४ व ९१ धावांवर श्रीलंकेविरुद्ध बाद झाला आहे तर ९७ धावांवर इंग्लंडविरुद्ध नाबाद राहिला आहे.
तब्बल ४ वेळा व क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात तो श्रीलंकेविरुद्ध नर्वस नाईंटीजमध्ये बाद झाला आहे. असा नकोसा विक्रम नावावर असलेला तो एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे.