एशिया कप (Asia Cup) स्पर्धेत सर्वच संघातील खेळाडू त्यांची सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या प्रयत्नात आहे. काहींनी पत्रकार परिषदेमध्ये त्याबाबत बोलूनही दाखवले आहे. यंदा ही स्पर्धा युएईमध्ये खेळली जाणार असून त्याची सुरूवात शनिवारी (२७ ऑगस्ट) होत आहे. पहिलाच सामना यजमान संघ श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात दुबई येथे खेळला जाणार आहे. श्रीलंकेच्या काही खेळाडूंनी इंडियन प्रीमियर लीगमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यातीलच एका खेळाडूने तशीच कामगिरी करण्याचा प्रयत्न असणार आहे, असे विधान केले आहे.
आयपीएलमध्ये श्रीलंकेचा फलंदाज भानुका राजपक्षे (Bhanuka Rajapaska) हा पंजाब किंग्जकडून खेळतो. त्याने पॉवर हिटींग प्रकारची फलंदाजी करत विशेष खेळी केल्या होत्या. यावरून त्याने ईएसपीएनक्रिकइंफोशी बोलताना आयपीएलच्या अनुभवाने मला राष्ट्रीय संघाकडून खेळण्यासाठी एक वेगळीच उर्जा आली आहे, असे मत मांडले आहे. या ताबडतोब फलंदाजीनेच तो यूएईच्या इंटरनॅशनल टी२० लीगच्या दुबई कॅपिटल्स संघाशी जोडला गेला आहे.
राजपक्षेने म्हटले, “श्रीलंकेत संघपुनरागमन करताना मी नवीन उर्जेने संघात सामील झालो आहे. आयपीएलमध्ये शिखर धवन, मयंक अगरवाल आणि कगिसो रबाडा यांच्याशी संवाद साधला आहे. त्यांच्याशी नेमका काय संवाद झाला हे सांगू शकत नाही, मात्र त्यांच्याशी बोलल्यानंतर मला चांगले वाटत आहे. श्रीलंका संघासाठीही आयपीएलमध्ये ज्या प्रकारची फलंदाजी केली होती तशीच करण्याचा प्रयत्न करणार आहे.”
राजपक्षेची आयपीएलमधील कामगिरी
पंजाब किंग्जसाठी या ३० वर्षीय खेळाडूने १५९.६८च्या स्ट्राईक रेटने २०६ धावा केल्या आहेत. श्रीलंकेचा ब गटात समावेश आहे. त्यांच्याबरोबरच बांगलादेशचाही समावेश आहे. यामुळे ब गटात चांगलेच टक्कर देणारे संघ आहेत. श्रीलंकेचे प्रशिक्षक क्रिस सिल्व्हरवूड यांना संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. त्यांनी काही महिन्यापूर्वीच श्रीलंकेच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी घेतली आहे.
राजपक्षेची आयपीएलमधील कामगिरी
श्रीलंकेकडून खेळताना राजपक्षेने २१ टी२० सामन्यांत १३४.६२च्या स्ट्राईक रेटने ३५० धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने २ अर्धशतकेही केली आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आफ्रिदी, वसीम बाहेर झाल्याने फिका पडला पाकिस्तानचा बॉलिंग अटॅक, भारतासाठी असेल ‘मौका मौका’!
तेंडुलकरांच्या घरी वाजणार सनई-चौघडे! सारा कधी करतेय लग्न? तिने स्वत:च सांगितलंय
भारत वि. पाकिस्तान सामन्यापूर्वी बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीचे मोठे वक्तव्य, ‘या’ टीमला म्हटले फेवरेट