अफगानिस्तान विरूद्ध झालेल्या कसोटी सामन्यात शतकी खेळी करणारा सलामिवीर शिखर धवनने कसोटी क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोंच्च स्थानी पोहचला आहे.
अफगानिस्तान विरूद्ध शतकी खेळी धवनच्या चांगलीच पथ्यावर पडली.
आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत शिखर धवनने दहा स्थानांची झेप घेत 34 व्या स्थानावरून 24 व्या स्थानी पोहचला आहे.
त्याचबरोबर अफगानिस्ता विरूद्ध सहा बळी मिळवणाऱ्या रविंद्र जडेजा गोलंदाजीत चौथ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानी पोहचला.
इंग्लंडचा जेम्स अॅडरसन गोलंदाजांच्या 892 रेटिंग्ससह अव्वल स्थानी आहे.
कसोटी फलंदाजी क्रमवारीत बॉल टेंम्परींगसाठी शिक्षा झालेला स्टिव स्मिथने गेल्या तीन महिन्यांपासून कसोटीत एकही सामना न खेळुनही अव्वल स्थान कायम राखले आहे. त्याचे 929 रेटिंग्स आहेत.
दुसऱ्या स्थानी भारताचा कर्णधार विराट कोहली 903 रेटिंग्ससह दुसऱ्या स्थानी आहे.
तर कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत बांग्लादेशचा शाकिब अल हसन 420 रेटिंग्ससह प्रथम स्थानी आहे.
आजच्या दिवसातील सर्वात महत्त्वाच्या बातम्या-
-अर्जून तेंडूलकरबद्दलची ही आहे दिवसातील सर्वात मोठी बातमी
-पृथ्वी शाॅ पुन्हा गरजला, २० चौकार आणि ३ षटकारांची आतिषबाजी
-अबब ! इंग्लंडने आॅस्ट्रेलियाला पाजले पाणी; वनडेत चोपल्या ४८१ धावा
-धावा केल्या इंग्लंडने ४८१; टेन्शन घेतलंय या भारतीय माजी कर्णधारान
-४८१ धावा तर केल्या; परंतु अजून १६ धावा केल्या असत्या तर इतिहास घडला असता!