---Advertisement---

भारतीय संघाचे ‘ठाकूर आणि गब्बर’; शिखर धवनने शेअर केलेला ‘हा’ फोटो जोरदार व्हायरल

On: शनिवार, जून 5, 2021 12:45 PM
---Advertisement---

सध्या भारतीय कसोटी संघातील खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर गेले असून येत्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी तयारी करत आहेत. तर दुसरीकडे शिखर धवन आणि नवोदित खेळाडूंचा संघ श्रीलंका दौऱ्याची तयारी लागले आहेत. दरम्यान, भारतीय खेळाडू सोशल मिडियाद्वारे चाहत्यांशी नेहमीच संपर्कात येत असतात. कधी त्यात प्रश्न-उत्तरांच्या सत्रात तर कधी फोटो तर कधी व्हिडीओच्या माध्यमातून ते चाहत्यांशी जोडलेले आहेत. नुकतेच असाच एक फोटो शिखर धवनने शेअर केला आहे, जो सध्या व्हायरल होत आहे.

भारतीय संघात खूप खेळाडू आहेत जे, मौज-मस्ती करण्यात नेहमी पुढे असतात. काही दिवसांपूर्वी विराट कोहलीनेसुद्धा इन्स्टाग्रामद्वारे चाहत्यांशी संपर्क साधला होता. त्यात त्याला एका चाहत्याने प्रश्न विचारला होता की, भारतीय संघात खोड्या करणारे खेळाडू कोण? त्यावर कोहलीने उत्तर दिले, संपूर्ण भारतीय संघच खोडकर खेळाडूंनी भरलेला आहे, त्यात भारतीय संघाचा खेळाडू शिखर धवन काही मागे नाही.

नुकताच शिखर धवनने भारतीय वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर सोबत इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. हा फोटो सोशल मिडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. फोटो व्हायरल होण्याचे मुख्य कारण म्हणजे शिखरने त्या फोटोला दिलेलं मजेशीर कॅप्शन. शिखरने शार्दुलबरोबरच्या फोटोला कॅप्शन दिले आहे की ‘गब्बर और ठाकूर ऑफ स्क्रीन’.

खरंतर सलामी फलंदाज शिखर धवनला ‘गब्बर’च्या नावाने ओळखतात. तर शार्दुलचं आडनाव ठाकूर आहे. त्यामुळे शिखरने त्यांच्या फोटोला ‘गब्बर आणि ठाकूर’ असे संबोधले आहे. गब्बर आणि ठाकूर हे प्रसिध्द चित्रपट ‘शोले’मधील भूमीका आहेत.

https://www.instagram.com/p/CPqV1GjNLic/

ह्या फोटोवर खूप कमेंट्स आल्या आहेत. त्यामध्ये भारतीय खेळाडू केदार जाधव यानेसुद्धा कमेंट केली आहे की ‘रेअर कॉम्बीनेशन’.

Photo Courtesy: Instagram/@shikhardofficial

पुढील महिन्यात होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी शिखर धवनची निवड होणे जवळपास निश्चित आहे. या दौऱ्यात मर्यादीत षटकांच्या मालिका खेळल्या जाणार आहेत. तसेच मालिकेसाठी वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत शिखर धवनकडे कर्णधारपद देण्याचीही शक्यता आहे. तर  शार्दुल ठाकूर सध्या भारतीय कसोटी संघासह इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. या इंग्लंड दौऱ्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आणि इंग्लंड विरुद्ध ५ कसोटी सामन्यांची कसोटी मालिका भारताला खेळायची आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

काय सांगता! ब्लाइंड डेटवर गेलेला विराट ‘या’ कारणामुळे केवळ ५ मिनिटात आला पळून, स्वत:च केला खुलासा

केकेआरला तगडा धक्का! ‘हा’ मॅचविनर खेळाडू खेळणार नाही आयपीएलचा उर्वरित हंगाम

ब्रॅडमन यांना १०० ची सरासरी ठेवण्यापासून रोखणारे एरिक हॉलिस, कारकिर्दीत मिळवले तब्बल २३२३ बळी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---