---Advertisement---

धवनची ‘गब्बर’ कामगिरी, वेस्ट इंडिजविरुद्ध अर्धशतक झळकावत रोहित, सेहवागवर ठरला वरचढ

Shikhar Dhawan vs WI
---Advertisement---

वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार शिखर धवन जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने पहिल्याच वनडे सामन्यात ९७ धावा ठोकत आपला फॉर्म दाखवला होता. यानंतर आता तिसऱ्या वनडे सामन्यातही त्याची बॅट तळपली आहे. त्याने या सामन्यात अर्धशतक ठोकले आहे. या अर्धशतकी खेळीसह त्याने मोठ्या विक्रमात रोहित शर्मा आणि माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग यांना मागे टाकले आहे.

बुधवारी (२७ जुलै) पोर्ट ऑफ स्पेन येथे झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात सलामीला फलंदाजीला येत धवनने अर्धशतक झळकावले. ७४ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने त्याने ५८ धावांची खेळी केली. परदेशातील वनडे सामन्यामध्ये सलामीला फलंदाजीला येत ५० पेक्षा जास्त धावा करण्याची ही त्याची १८ वी वेळ होती. या खेळीसह त्याने विरेंद्र सेहवागला मागे सोडले आहे.

या सामन्यापूर्वी परदेशात सर्वाधिकवेळा ५० पेक्षा जास्त धावा करणाऱ्या भारतीय सलामीवीरांच्या यादीत धवन सेहवागसोबत संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर होता. दोघांच्याही नावे १७ वेळा ५० पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम होता. मात्र आता धवन सेहवागच्या पुढे निघून गेला आहे.

असे असले तरीही धवनपुढे या यादीत आणखी २ खेळाडू आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर सर्वाधिक २४ वेळा ५० पेक्षा जास्त धावा करत अव्वलस्थानी विराजमान आहे. तर विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने २१ वेळा परदेशात वनडेत सलामीला फलंदाजी करताना ५० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या.

वनडे सामन्यांमध्ये भारतीय सलामीवीरांच्या सर्वाधिक वेळा ५०+ धावा:
२४ वेळा- सचिन तेंडुलकर
२१ वेळा- सौरव गांगुली
१८ वेळा- शिखर धवन
१७ वेळा- विरेंद्र सेहवाग
१४ वेळा- रोहित शर्मा

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

SCOvNZ: ऍलनचा शतकी तडाखा आणि सोढीच्या फिरकीपुढे स्कॉटलंड नतमस्तक

टी२० क्रिकेटमध्ये घडला अद्वितीय पराक्रम, एकाच दिवशी ३ फलंदाजांनी ठोकली शतके

धवन-गिल जोमात, वेस्ट इंडिज कोमात! तिन्ही वनडेत कॅरेबियन्सना फुल नडले

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---