---Advertisement---

पंजाबी मुंडा शिखर धवन शिकवतोय लाजाळू अजिंक्य रहाणेला भांगडा, पहा व्हिडीओ…

On: मंगळवार, सप्टेंबर 15, 2020 3:53 PM
---Advertisement---

मुंबई । इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2020 सुरू होण्यास अजून काही दिवस बाकी आहेत. अशा परिस्थितीत सर्व संघ सध्या स्पर्धेच्या तयारीत व्यस्त आहेत. नेट प्रॅक्टिससह खेळाडू स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी बरेच मार्ग अवलंबत आहेत. सर्व संघांनी आयपीएलसाठी खेळाडूंच्या व्हिडिओचे शूटिंगही सुरू केले आहे. नुकतेच दिल्ली कॅपिटल्सने देखील शूटिंग केले आहे. दरम्यान, यावेळी शिखर धवन हा अजिंक्य रहाणे आणि आर.अश्विन यांना पंजाबी नृत्य शिकवताना दिसला.

शिखर धवननेही हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. शिखर आपल्या पोस्टमध्ये म्हणतो,” माझ्या दोन सहकारी खेळाडूंना पंजाबी नृत्याच्या काही स्टेप्स शिकवतोय, परंतु त्यांना लयमध्ये येण्यास थोडा वेळ लागत आहे. मुळात ते खूपच लाजाळू आहेत. त्यांना नाचताना पाहून आनंद होतोय. मित्रांनो, नेहमी मजा करा आणि आपल्या आतील बालपण जिवंत ठेवा.”

https://www.instagram.com/p/CFG3pE4Dkw-/

विशेष म्हणजे दीर्घ प्रतीक्षेनंतर इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) वेळापत्रक 6 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आले. परंपरेनुसार गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा सामना अबू धाबी येथे 19 सप्टेंबर रोजी गतवर्षीच्या उपविजेते चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. भारतातील कोविड -१९ च्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे यावर्षी संयुक्त अरब अमिरातीमधील (यूएई) तीन ठिकाणी आयपीएल होत आहे. यात दुबई, अबू धाबी आणि शारजा या शहरांचा समावेश आहे.

या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यानंतर दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब दुसर्‍या दिवशी दुबईमध्ये आमने सामने येतील तर 21 सप्टेंबर रोजी सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. 22 सप्टेंबर रोजी शारजाहमधील पहिला सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज दरम्यान खेळला जाईल.

स्पर्धेचा अंतिम सामना १० नोव्हेंबर रोजी होणार आहे. परंतू प्ले ऑफच्या सामन्यांबद्दल बीसीसीआयने कोणतीही घोषणा केलेली नाही.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---