भारत आणि श्रीलंका (India and Shrilanka hosted the tournament) येथे सध्या टी-20 वर्ल्ड कप 2026 चा थरार सुरू आहे. याच दरम्यान भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताचा माजी दिग्गज फलंदाज शिखर धवनने (Shikhar Dhawan) दुसऱ्यांदा लग्न केले आहे. त्याने सोफी शाइन (Sophie Shine) हिच्याशी लग्नाची गाठ बांधली आहे. याआधी 12 जानेवारीला या दोघांचा साखरपुडा झाला होता, ज्याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.
शिखर धवन आणि त्याची पहिली पत्नी आयशा मुखर्जी यांचा ऑक्टोबर 2023 मध्ये अधिकृतपणे घटस्फोट झाला होता. 2011 मध्ये लग्न झालेल्या या जोडीने 11 वर्षांचे नाते संपवण्याचा निर्णय घेतला होता. घटस्फोटानंतर धवन आणि सोफी शाइन एकमेकांच्या प्रेमात पडले आणि गेल्या काही वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये होते.
Heartiest congratulations to Shikhar Dhawan on his wedding ❤️
— ~ (@Ro_Hrishu_45) February 21, 2026
🥹🫶🏻 @SDhawan25 pic.twitter.com/N03nFJ5EWR
सोफी मूळची आयर्लंडची असून ती व्यवसायाने ‘प्रोडक्ट कन्सल्टंट’ आहे. तिने लाइमरिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून पदवी पूर्ण केली आहे आणि कॅसलरॉय कॉलेजमधून मार्केटिंग आणि मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. तिने ‘नॉर्दर्न ट्रस्ट कॉर्पोरेशन’मध्ये सेकंड व्हाइस प्रेसिडेंट म्हणूनही काम पाहिले आहे. काही दिवसांपूर्वीच सोफीने शिखर धवनसोबतच्या त्यांच्या हळदी समारंभाचे फोटो शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.






