भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यातील मर्यादीत षटकांच्या मालिका संपल्या आहेत. तर कसोटी मालिका 1 आॅगस्टपासून सुरु होणार आहे. त्यामुळे खेळाडूंना काही दिवस विश्रांती मिळाली आहे.
या वेळात भारताचा कर्णधार विराट कोहली आणि शिखर धवनने कुटुंबासमवेत वेळ घालवण्यास प्राधान्य दिले आहे. हे दोघेही कुटुंबासोबत गेलेल्या सहलीदरम्यानचा फोटो शिखरने ट्विटरवर शेअर केला आहे.
यात शिखर त्याची पत्नी आयेशा आणि त्याची मुले यांच्याबरोबर विराट आणि त्याची पत्नी अनुष्का शर्माही आहे. या फोटोला गमतीदार कॅप्शन देताना शिखरने लिहिले आहे की “या दोन अनोळखी व्यक्तींबरोबर रस्त्यावर फिरत आहे.”
Just strolling around the street with these two strangers 😜 pic.twitter.com/TlEOFqFzR5
— Shikhar Dhawan (@SDhawan25) July 19, 2018
याबरोबरच या दोघांनीही आणखीही काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.
— Virat Kohli (@imVkohli) July 19, 2018
Meal with the bestest! ♥️♥️♥️ pic.twitter.com/4UwGbHxIyE
— Virat Kohli (@imVkohli) July 20, 2018
भारताने इंग्लंड विरुद्ध पार पडलेल्या टी20 मालिकेत 2-1 ने विजय मिळवला तर वनडे मालिकेत भारताला 2-1 ने पराभव स्विकारावा लागला होता.
आता भारतीय संघ 1 आॅगस्टपासून 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बुधवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
भारतीय संघात मर्यादित षटकांच्या मालिकेत उत्तम कामगिरी करणाऱ्या कुलदीप यादवला संधी देण्यात आली आहे. तसेच कसोटी क्रिकेटमधील नियमीत यष्टीरक्षक वृद्धिमान सहा दुखापतग्रस्त असल्याने दिनेश कार्तिकला संघात घेण्यात आले आहे.
तर रिषभ पंतलाही पहिल्यांदाच भारताच्या कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–कुलदीपच्या कसोटी संघातील समावेशाने मुंबईकर माजी फलंदाज नारज
–सर व्हिव रिचर्ड्स यांचा 38 वर्षापूर्वीचा विक्रम पाकिस्तानी फलंदाज मोडणार?
–इंग्लिश फलंदाज म्हणतो, एकदिवसीय मालिकेप्रमाणे कसोटी मालिकेतही भारताचा पराभव करणार