भारतीय संघातील खेळाडू शिखर धवन अनेक दिवसांपासून पत्नी आयेशा मुखर्जीपासून वेगळा राहत आहे. खरं तर, या दोघांमध्ये घटस्फोटाची केस सुरु आहे. आयशा मुखर्जीचा मुलगा जोवर सोबत ऑस्ट्रेलियामध्ये राहते. मात्र आता दिल्लीतील फॅमिली कोर्टाने या प्रकरणाबाबत मोठा आदेश सुनावला आहे. फॅमिली कोर्टाने म्हटले की, शिखर धवनच्या कुटुंबात एक कार्यक्रम आहे. त्यामुळे शिखरचा मुलगा जोरावरला भारतात आणावे. यासोबतच न्यायमूर्ती हरीश कुमार यांनी जोरावरला भारतात आणण्यावर आक्षेप घेतल्याबद्दल आयेशाला खडसावले आहे.
आयशा मुखर्जीविरोधात न्यायालयाची कडक कारवाई!
माध्यमांनुसार, आयशाने जोरावरला भारतात आणण्यावारून आक्षेप घेतला होता. त्यानंतर कोर्टाने कठोर भूमिका घेतली. शिखर धवनचे (Shikhar Dhawan) कुटुंबीय गेल्या तीन वर्षांपासून जोरावरला भेटलेले नाहीत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फॅमिली फंक्शनची तारीख 17 जून निश्चित करण्यात आली होती, परंतु आयशाने शाळा सुरू असल्याचे सांगत जोरावरला (Zorawar) भारतात आणण्यास आक्षेप घेतला. त्यानंतर हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. आता 1 जुलै रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
आयेशा मुखर्जीचा आक्षेप काय आहे?
आयशाने (Ayesha Mukherjee) आक्षेप घेतला आणि सांगितले की कौटुंबिक कार्य फ्लॉप ठरेल. कारण तारीख निश्चित करण्यापूर्वी बहुतेक सदस्यांशी सल्लामसलत करण्यात आली नव्हती. तसेच, शिखर व्यतिरिक्त इतर कोणाला भेटायला जोरावरला सोयीचे वाटत नाही, अशी चिंता आयेशाने व्यक्त केली. आता न्यायालयाचे म्हणणे आहे की या प्रकरणात दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करत आहेत. कोर्टाच्या म्हणण्यानुसार, शिखर आपल्या मुलाच्या कायमस्वरूपी ताब्याची (Delhi Family Court) मागणी करत नाही, तर जोरावरने पुढील काही दिवस भारतात यावे, अशी त्यांची इच्छा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विक्रमवीर रोहित! 15 धावांवर बाद होऊनही रचला इतिहास, ICC Finalमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा एकटाच खेळाडू
नॉटआऊट असूनही रहाणेला पंचांनी दिले आऊट, मग मैदानात झालेला ड्रामा आख्ख्या जगाने पाहिला; Video