चेन्नई । भारताचा सलामीवीर शिखर धवन ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या पहिल्या तीन सामन्यातून बाहेर पडला आहे. १७ सप्टेंबरपासून या पाच सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे.
आपल्या पत्नीची प्रकृती ठीक नसल्याकारणाने शिखर धवनने बीसीसीआयकडे आपल्याला पहिल्या तीन सामान्यांसाठी मुक्त करण्याची विनंती केली. ती बीसीसीआयने मंजूर केली आहे.
सलामीवीरांना बॅकअप म्हणून सध्या संघात केएल राहुल आणि अजिंक्य रहाणे हे खेळाडू आधीपासूनच आहेत. शिखर धवनच्या जागी संघात नवीन खेळाडूला संधी दिली जाणार नसल्याचं बीसीसीआयकडून कळवण्यात आले आहे. त्यामुळे रहाणे किंवा राहुल यापैकी एका खेळाडूला पहिल्या सामन्यात रोहित शर्मा बरोबर सलामीला संधी मिळणार आहे.
श्रीलंका दौऱ्यातही आईची प्रकृती ठीक नसल्याकारणाने शिखरने शेवटच्या दोन सामन्यात माघार घेतली होती.