---Advertisement---

राजस्ठानचा धाकड फलंदाज हेटमायर बनला ‘बाप’माणूस, गोंडस व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

Shimron-Hetmyer
---Advertisement---

आयपीएल २०२२मध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्त्व करत असलेला धाकड फलंदाज शिमरॉन हेटमायर हा बाबा (Shimron Hetmyer Become Father) बनला आहे. त्याने स्वत: मंगळवारी (१० मे) सकाळी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे. हेटमायरने त्याच्या नवजात बाळासोबत खेळतानाचा गोंडस व्हिडिओ स्टोरीमध्ये ठेवला आहे. हेटमायरच्या ही पोस्ट काही क्षणातच व्हायरल झाली असून अनेकांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

राजस्थान संघासाठी (Rajasthan Royals) मॅच विनिंग खेळी खेळणारा हेटमायर (Shimron Hetmyer) २ दिवसांपूर्वीच त्याच्या पहिल्या बाळाच्या जन्मासाठी घरी परतला (First Child Birth) होता. राजस्थान संघाने ट्वीटरवर व्हिडिओ शेअर करत यासंदर्भात माहिती दिली होती. हेटमायर त्याच्या बाळाच्या जन्मानंतर मुंबईला परतणार आहे आणि आयपीएलमधील उर्वरित सामन्यांसाठी उपलब्ध राहणार आहे.

राजस्थान संघाचे चालू हंगामातील प्रदर्शन
राजस्थान संघ जणू या हंगामात दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्यासाठी जणू चंग बांधून मैदानात उतरला आहे. त्यांनी आतापर्यंत ११ सामने खेळले असून त्यापैकी ७ सामने जिंकले आहेत, तर ४ सामने गमावले आहेत. परिणामी त्यांच्या खात्यात १४ गुणांची नोंद आहे. गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यानंतर राजस्थान संघ प्लेऑफचा प्रबळ दावेदार आहे. अजून त्यांचे ३ सामने खेळायचे बाकी आहेत.

शिमरॉन हेटमायर राजस्थानसाठी ठरलाय मॅच विनर
हेटमायरने या हंगामात राजस्थान संघाचे ११ सामन्यांमध्ये प्रतिनिधित्त्व करताना ७२.७५च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून एक अर्धशतक निघाले आहे. त्याने बऱ्याच सामन्यांमध्ये राजस्थान संघाला अंतिम षटकात सामना जिंकून देण्याचे काम केले आहे. यामध्ये पंजाब किंग्जविरुद्धच्या हंगामातील ५२व्या सामन्याचाही समावेश आहे. या सामन्यात पंजाबच्या १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हेटमायरने १६ चेंडूत नाबाद ३१ धावांची खेळी केली होती, ज्याच्या जोरावर राजस्थानने २ चेंडू शिल्लक ठेवून सामना जिंकला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---