---Advertisement---

ZIM vs WI: वानखेडेवर शिमरॉन हेटमायरचं वादळ! अवघ्या 19 चेंडूत ठोकलं अर्धशतक; मोडला स्वतःचाच विक्रम

On: सोमवार, फेब्रुवारी 23, 2026 10:39 PM
---Advertisement---

वेस्टइंडीज आणि झिम्बाब्वे (Zim vs WI) यांच्यातील टी-20 विश्वचषक सुपर-8 चा सामना 23 फेब्रुवारीला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. झिम्बाब्वेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो पूर्णपणे चुकीचा ठरल्याचे दिसत आहे. वेस्टइंडीजची सुरुवात खराब झाली आणि सलामीवीर ब्रेंडन किंग तिसऱ्या षटकात बाद झाला. मात्र, त्यानंतर फलंदाजीला आलेल्या शिमरॉन हेटमायरने (Shimron hetmayar) झंझावाती फलंदाजी करत अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक ठोकले. यासह शिमरॉन हेटमायर आता वेस्टइंडीजसाठी टी-20 विश्वचषकात सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणारा फलंदाज बनला आहे.

शिमरॉन हेटमायरने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 5 षटकार मारले. त्याने या विश्वचषकातील (2026) सर्वात वेगवान अर्धशतकाच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करमने (Aiden Markram) न्यूझीलंडविरुद्ध आणि श्रीलंकेच्या शनाकाने ओमानविरुद्ध 19 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. तर, भारताचा इशान किशन (20 चेंडू) या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

शिमरॉन हेटमायरने वेस्टइंडीजसाठी नवा इतिहास रचला आहे. त्याने झिम्बाब्वेविरुद्ध 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. तसेच त्याने याच स्पर्धेत स्कॉटलंडविरुद्ध 22 चेंडूत अर्धशतक केले होते. याआधी ख्रिस गेलने 2009 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 23 चेंडूत 50 धावा केल्या होत्या. शिमरॉन हेटमायरने या सामन्यात एकूण 34 चेंडूत 85 धावांची खेळी केली. यामध्ये 7 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. त्याचा स्ट्राईक रेट 250 चा होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---