इंडियन प्रीमियर लीग २०२२ (आयपीएल २०२२) चा मेगा लिलाव बेंगलोर येथे पार पडला. १२ फेब्रुवारी रोजी पहिल्या दिवशी अनेक खेळाडूंना मोठी बोली लागलेली दिसली. दुसऱ्या दिवशीही काही निवडक खेळाडू करोडपती यामध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई इंडियन्स प्रतिनिधित्व करणारा तसेच भारतीय संघासाठी खेळलेला युवा अष्टपैलू शिवम दुबे याच्यासाठी देखील मोठी बोली लागली. १३ फेब्रुवारी हा दिवस त्याच्यासाठी आनंद द्विगुणित करणारा ठरला.
सकाळी बनला पिता
आपल्या आक्रमक फलंदाजीसाठ प्रसिद्ध असणाऱ्या शिवम याने रविवारी (१३ फेब्रुवारी) सकाळी आपल्या इंस्टाग्राम हॅण्डलवरून आपण पिता बनल्याची बातमी दिली होती. त्याने आपली पत्नी अंजुम खान व मुलाचा फोटो पोस्ट करत, ’आमच्या आयुष्यात आनंद आला आहे’ असे कॅप्शन लिहिले होते. अंजुम व शिवम यांनी मागील वर्षी १६ जुलै रोजी लग्नगाठ बांधली होती.
https://www.instagram.com/p/CZ57jk9NHiF/?utm_medium=copy_link
आयपीएल लिलावात लागली कोट्यवधींची बोली
मागील वर्षी राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिवमसाठी यावेळी पुन्हा एकदा राजस्थान संघ उत्सुक दिसला. मात्र, त्यांनी लवकरच लिलावातून माघार घेतली. पंजाब किंग्स व लखनऊ सुपरजायंट्सनेही त्याच्यावर मोठी बोली लावली. मात्र, अखेरीस चेन्नई सुपर किंग्जने लिलावात उडी मारत ४ कोटी रुपयांच्या रकमेसह त्याला आपल्या संघात सामील केले. शिवम दुबे हा आक्रमक फलंदाजी सहज सामना संपवण्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच तो मध्यमगती गोलंदाजी देखील करू शकतो. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने दोन वेळा एका षटकात ५ षटकार मारण्याची कामगिरी करून दाखवली आहे. हार्दिक पंड्याचा बॅकअप म्हणून त्याचा भारतीय संघात अनेक वेळा समावेश केला गेला आहे.
महत्वाच्या बातम्या-