चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात शनिवार 3 मे रोजी रोमांचक सामना खेळला गेला. या सामन्यात आरसीबीने शानदार विजय मिळवत पॉईंट्स टेबलवर टॉपच्या स्थानि कब्जा केला आहे. सीएसकेचा खेळाडू शिवम दुबेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शिवम दुबेला आरसीबी चाहत्यांनी ट्रोल केल्यानंतर त्याने प्रत्युत्तर दिलं आहे. शिवम दुबेने प्रत्युत्तर देऊन चाहत्यांची बोलती बंद केली आहे.
त्याचा वायरल होत असलेला व्हिडिओ मागच्या सामन्यातील आहे, जेव्हा बंगळूरूने चेपॉकच्या मैदानावर चेन्नईला पराभूत केले होते. त्यावेळी शिवम दुबे जेव्हा ड्रेसिंग रूममध्ये परत जात होता, तेव्हा चाहत्यांनी त्याला चेन्नईच्या पराभवावर ट्रोल केले तेव्हा शिवमने त्याच्या चेन्नईच्या जर्सीवरील छापलेल्या पाच आयपीएल ट्रॉफी त्यांना दाखवल्या त्यामुळे त्यांची बोलती बंद झाली आहे.
या हंगामात चेन्नई आणि बंगळूरुमध्ये दोन सामने झाले. या दोन्ही सामन्यात आरसीबीने चेन्नईचा पराभव केला आहे. पहिल्यांदा बंगळुरूने चेन्नईचा त्यांच्या घरेलू मैदानात पराभव केला होता. तसेच दुसऱ्या वेळेस आरसीबीच्या घरेलू मैदानात त्यांनी चेन्नईचा पराभव केला. चेन्नई संघाचं या हंगामातील प्रदर्शन अतिशय खराब राहिलं आहे. त्यांच्या प्लेऑफच्या आशा पूर्णरित्या संपलेल्या आहेत.





