शिवनेरी सेवा मंडळ कबड्डी स्पर्धेत आर. बी. आय. व सचिवालय जिमखाना यांची विजयी सलामी

दादर। शिवनेरी सेवा मंडळ, दादर आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली. व्यवसायीक श्रेणी अ आणि महाविद्यालय गटाच्या सामन्यांना पहिल्या दिवशी सुरुवात झाली. आर. बी. आय., सचिवालय जिमखाना व टी. बी. एम. स्पोर्ट यांनी व्यवसायिक अ गटात विजयी सलामी देत पुढील फेरीत प्रवेश मिळवला.

आर बी आय विरुद्ध श्री सिद्धिविनायक न्यास यांच्यात झालेल्या सामन्यात आर बी आयने ४१-०८ असा एकतर्फी विजय मिळवला. तर सचिवालय जिमखाना विरुद्ध जी खामकर स्पाईस यांच्यात चांगला सामना झाला. मध्यंतरापर्यत सचिवालय जिमखाना यांच्याकडे १०-९ अशी अवघ्या १ गुणांची आघाडी होती. शेवटच्या १० मिनीटामध्ये सचिवालय जिमखाना यांनी आपला खेळ उंचावत ३३-२९ असा विजय मिळवला.

टी बी एम स्पोर्ट्सने सिद्धी कन्सल्टसी संघाचा ४८-०७ असा धुव्वा उडवला. तर महाविद्यालयीन गटात सिद्धार्थ कॉलेज विरुद्ध कीर्ती कॉलेज यांच्यात झालेल्या सामन्यात सिद्धार्थ कॉलेजने ३९-२२ असा विजय मिळवला. अभिनव कॉलेजने २९-१८ असा मॉडेल कॉलेज वर विजय मिळवला.

आय सी एल इ कॉलेज वाशी विरुद्ध एन के टी टी कॉलेज यांच्यात चुरशीची लढत झाली. मध्यंतरापर्यत एन के टी टी कॉलेज कडे १८-१५ अशी आघाडी होती. मध्यंतरांतर आय सी एल इ कॉलेज वाशी संघाने आक्रमक खेळ करत आघाडी मिळवत ३३-२७ असा विजय मिळवला.

आज स्पर्धेच्या दुसऱ्यादिवशी विशेष व्यवसायिक गटाचे सामने सुरू होणार असून भारत पेट्रोलियम विरुद्ध मुंबई महानगरपालिका यांच्यात पहिली लढत होईल. तर सेंट्रल रेल्वे विरुद्ध न्यू इंडिया इन्शुरन्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा विरुद्ध जिजाऊ हे सामने आज खेळवले जातील.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

दबंग दिल्लीच्या नवीन एक्सप्रेसला मेगाब्लॉक नाही…

ब्लॉग: प्रो कबड्डीतले ‘ओल्ड हॉर्सेस’

You might also like

Leave A Reply