कुस्ती महर्षी स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडा नगरी, पुणे येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2023 पार पडली. शनिवार (14 जानेवारी) रोजी या स्पर्धेची अंतिम लढत गादी विभागातील विजेता शिवराज राक्षे आणि माती विभागातील विजेता महेंद्र गायकवाड यांच्यात झाली. प्रेक्षकांची खचाखच भरलेल्या क्रीडांगणात अत्यंत चुरशीच्या झालेल्या किताबी लढतीत शिवराज राक्षे याने महेंद्र गायकवाड याला चितपट करत करत महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली. शिवराज राक्षेच्या रुपाने कुस्ती क्षेत्राला नवा महाराष्ट्र केसरी मिळाला.
महाराष्ट्र केसरी 2023 स्पर्धेच्या अंतिम लढतीत शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यातील घमासान प्रक्षकांना पाहायला मिळणार, यासाटी सर्वजण लढतीवर लक्ष ठेवून होतो. मात्र, शिवराजने अवघ्या 2 ते 2.30 मिनिटांमध्ये प्रतिस्पर्धीत मेहंद्र गायकवाडला चितपत करून विजय मिळवला. महाराष्ट्र केसरीचा हा 65 वी स्पर्धा असून शिवराज आजपर्यतचा 45 वा महाराष्ट्र केसरी ठरला. स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, अखिल भारतीय कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष ब्रिजभूषन सिंग, भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील आणि क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी उफस्थिती लावली.
(Shivraj Rakshe became the new Maharashtra Kesari, defeated Mahendra Gaikwad in the final)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्र केसरी 2023 | माती विभागातून महेंद्र गायकवाड फायनलमध्ये, सिकंदरला दाखवले आस्मान
महाराष्ट्र केसरी 2023 | गादी विभागातून शिवराज राक्षे फायनलमध्ये, हर्षवर्धन सदगीरला पराभूत