युजवेंद्र चहल हा सध्या भारतीय संघाचा प्रमुख फिरकीपटू आहे. वनडे क्रिकेटमध्ये त्याला सर्वांच्या आधी संधी दिली जाते. मात्र, नजीकच्या काळात त्याची कामगिरी तितकीशी प्रभावी झालेली नाही. टी20 विश्वचषकात त्याला संधी मिळाली नव्हती. तर, न्यूझीलंड दौऱ्यावर त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. असे असले तरी तो मागील पाच वर्षापासून भारतीय संघाचा नियमित सदस्य आहे. त्याच्या या यशाचे श्रेय भारतीय संघाचे माजी फिरकीपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी विराट कोहली याला दिले आहे.
चहल हा 2017 पासून भारतीय संघाचा नियमित सदस्य आहे. त्याने चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव यांच्यासह अनेक विरोधी संघांना पाणी पाजण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, यावर्षीच्या आयपीएल नंतर त्याचा फॉर्म काहीसा डळमळीत झाला आहे. त्याच्या याच खराब कामगिरीनेवर बोलताना लक्ष्मण शिवरामकृष्णन म्हणाले,
“चहल एक दर्जेदार खेळाडू आहे यात शंकाच नाही. मात्र, आत्ता तो हवी तशी कामगिरी करत नाही. मला तरी असे वाटते की त्याच्या कारकिर्दीचा आलेख मोठा करण्यात विराट कोहली याचे महत्त्वाचे योगदान आहे. कारण, विराट एकाच वेळी भारतीय संघ व चहल खेळत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघासाठी खेळायचा. त्यामुळे विराटला चहलच्या माईंड सेटविषयी माहीत होते.”
ते पुढे म्हणाले,
“कोणत्याही खेळाडूच्या परीक्षेचा काळ तेव्हा असतो जेव्हा विरोधी संघ त्याच्या खेळाचा अभ्यास करतात. टी20 क्रिकेटमध्ये फलंदाज नेहमीच आक्रमण करण्याचा विचार करतो. मात्र, वनडे क्रिकेटमध्ये पुरेसा वेळ असल्याने फलंदाज विचारपूर्वक खेळतात.”
याच मुलाखतीत शिवरामकृष्णन यांनी पुढील विश्वचषकात कुलदीप यादव याला चहलच्या आधी संधी देण्यात यावी असे देखील म्हटले.
(Shivramkrishnan Said Virat Kohli Is Reason Of Chahal Success)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बांगलादेशला धक्क्यावर धक्के, ‘या’ गोलंदाजाच्या बाहेर जाण्याने रोहितची चिंता मिटली
नवे निवडसमिती अध्यक्ष म्हणून या दिग्गजाचे नाव आघाडीवर; वेळोवेळी मोठे केलेय देशाचे नाव