नवयुवक कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, कुंडल आयोजीत ता.पलूस, जि. सांगली येथे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धात महिला गटात मुंबई शहराच्या शिवशक्ती संघाने तर पुरुष गटात पुण्याच्या बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन संघाने अंतिम विजेतेपद पटकावले. कल्याण राज्यस्तरीय स्पर्धेत सुद्धा हेच दोन्ही संघ अंतिम विजेते होते.
महिला गटात मुंबईच्या शिवशक्ती महिला संघ विरुद्ध पुणेच्या राजमाता जिजाऊ संघ यांच्यात अंतिम लढत झाली. ५-५ चढाईत झालेल्या सामन्यांत शिवशक्ती संघाने बाजी मारली. अंतिम सामना २७-२७ असा बरोबरीत सुटल्यानंतर ५-५ चढाईत शिवशक्ती संघाने ३२-२९ (७-४) अशी बाजी मारली. प्रतीक्षा तांडेलच्या चढाईत मिळालेले २ गुण निर्णायक ठरले.
शिवशक्तीकडून पूजा यादव, अपेक्षा टाकले, पौर्णिमा जेधे यांनी उत्कृष्ट खेळ केला. तर राजमाता जिजाई संघाकडून अंकिता जगताप, मानसी सावंत व सलोनी गजमल चांगल्या खेळल्या. अंतिम विजेत्या शिवशक्ती संघाला १,००,००१ /- रोख रुपये चषक तर उपविजेत्या राजमाता जिजाऊ संघाला ७५,०००/- रोख रुपये देऊन गौरविण्यात आले.
त्याआधी झालेल्या उपांत्य फेरीत शिवशक्ती संघाने जय हनुमान बाचणी संघावर ४०-१६ असा विजय मिळवला. तर राजमाता जिजाऊ संघाने ५२-१८ असे शिवओम संघास नमवले. महिला गटातील सर्वात्कृष्ट खेळाडु (१५,०००/- रुपये) म्हणून राजमाता जिजाऊ संघाच्या अंकिता जगतापची निवड करण्यात आली. तर स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईपटू म्हणून जय हनुमान बाचणीच्या आरती पाटील व उत्कृष्ट पकडपटू म्हणून शिवशक्ती संघाच्या पौर्णिमा जेधे यांना प्रत्येकी १०,०००/- रुपये देऊन गौरविण्यात आले.
पुरुष गटात बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन संघाने अंतिम सामन्यांत उत्कर्ष क्रीडा संस्था संघावर ३१-१७ असा विजय मिळवत अंतिम विजेतेपद पटाकवले. अक्षय जाधव, सुनील दुबिले व मनोज बोन्द्रे यांनी उत्कृष्ट खेळ केला. अंतिम विजेत्या बाबुराव चांदेरे सोशल फौंडेशन संघाला १,००,०००/- रोख रुपये तर उपविजेत्या उत्कर्ष संघास ७५,००० /- रुपये देऊन गौरविण्यात आले.
उपांत्य फेरीत बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन संघाने विजय क्लब मुंबई संघाचा ४०-१९ असा पराभव केला, तर उत्कर्ष पुणे संघाने शिव शाहू सडोली कोल्हापूर संघाचा ३१-१७ असा पराभव केला. सर्वात्कृष्ट खेळाडु (१५,०००/- रुपये) म्हणून बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन संघाच्या अष्टपैलू अक्षय जाधव ह्यांची निवड करण्यात आली. तर स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईपटू म्हणून उत्कर्ष संघाच्या गणेश कांबळे व उत्कृष्ट पकडपटू म्हणून उत्कर्ष संघाचा ओमकार घोडके यांना प्रत्येकी १०,०००/- रुपये देऊन गौरविण्यात आले.
भारत-ऑस्ट्रेलिया टी२० मालिका हा संघ जिंकणार, रिकी पाँटिंगची मोठी भविष्यवाणी
वाचा👉https://t.co/UFiPwoHE2U👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvsAUS @RickyPonting— Maha Sports (@Maha_Sports) January 13, 2020
कुंडल राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत आज अंतिम थरार
वाचा👉https://t.co/GAPkZIVxRL👈#Kabaddi #म #मराठी— Maha Sports (@Maha_Sports) January 12, 2020