---Advertisement---

शिवतेज, छत्रपती शिवाजी, ज्ञानशक्ती व राजश्री शाहू संघ जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत.

On: रविवार, जून 2, 2019 2:38 PM
---Advertisement---

ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व श्री गणेश क्रीडा मंडळ च्यावतीने भव्य जिल्हास्तरीय महिला गट कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे. मराठी शाळेच्या मैदानावर सुरू असलेल्या यास्पर्धेत २० संघानी सहभाग घेतला होता. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत छत्रपती शिवाजी अ, ज्ञानशक्ती, शिवतेज, राजश्री शाहू यासंघानी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.

छत्रपती शिवाजी डोंबीवली विरुद्ध जय बजरंग वाशिंद यांच्यात झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यांत छत्रपती शिवाजी अ संघाने ३१-२० असा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.

दुसरा उपांत्यपूर्व सामना अत्यंत चुरशीचा झाला. सुरुवातीला आक्रमक खेळ करत होतकरु क्रीडा मंडळ ठाणे संघाने आघाडी मिळवली होती. मध्यंतरा पर्यत १९-१६ अवघी तीन गुणांची आघाडी होतकरू ठाणे कडे होती.

उत्तरार्धात ज्ञानशक्ती संघाने होतकरू वर लोन टाकत आघाडी मिळवली. शेवटचा १ मिनिट शिल्लक असताना होतकरू कडे पुन्हा एकदा १ गुणांची आघाडी मिळाली. शेवटच्या मिनिटात ज्ञानशक्ती संघाने सुपरटॅकल करत ३४-३३ असा विजय मिळवला.

राजश्री शाहू संघाने ३८-२१ असा प्रेरणा मंडळ ठाणे वर विजय मिळवला, तर शिवतेज क्रीडा मंडळ ठाणे संघाने संकल्प क्रीडा मंडळ ठाणे संघाचा ४६-४० असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.

आज होणारे सामने

उपांत्य सामने:

१) छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळ (अ) विरुद्ध राजश्री छत्रपती शाहू प्रतिष्ठान ऐरोली

२) ज्ञानशक्ती क्रीडा मंडल कल्याण विरुद्ध शिवतेज क्रीडा मंडळ ठाणे

अंतिम सामना
उपांत्य सामना १ विजयी विरुद्ध उपांत्य सामना २ विजयी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment