इंडियन प्रीमियर लीग २०२२ ची रणधुमाळी सुरू झाली असून जगभरात या लीगचीच चर्चा आहे. जगभरातील एकाहून एक मातब्बर खेळाडू या लीगमध्ये सहभागी होत असतात. मात्र भारताचा शेजारी देश, पाकिस्तान संघाच्या खेळाडूंवर मात्र आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी आहे. दरम्यान पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने पाकिस्तान संघाचा विद्यमान कर्णधार बाबर आझम याच्याबाबत मोठा दावा केला आहे.
अख्तरचे (Shoaib Akhtar) असे म्हणणे आहे की, वनडे आणि टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अव्वल फलंदाज आझम (BabarAzam) आयपीएलमध्ये खेळला, तर त्याची किंमत १५-२० कोटी रुपये (Babar Azam IPL Price) असेल.
‘रावळपिंडी एक्सप्रेस’ नावाने क्रिकेटविश्वात प्रसिद्ध असलेला अख्तर आयपीएलसाठी स्पोर्ट्सकीडासोबत जोडला गेला आहे. येथे तो भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याच्यासोबत मिळून आयपीएल सामन्याचा प्रिव्ह्यू आणि रिव्ह्यू करत असतो. यादरम्यान अख्तरने त्याने विचार व्यक्त करत आझमला भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीसोबत खेळताना पाहणे, हा सर्वात मोठा क्षण असेल, असेही म्हटले आहे.
अख्तर म्हणाला की, “आयपीएलमध्ये एक दिव आझम आणि कोहली यांना एकत्र डावाची सुरुवात करताना पाहून मला खूप चांगले वाटेल. तसेच तो क्षणही किती रोमांचक असेल, जेव्हा आयपीएलच्या लिलावात आझम १५-२० कोटी रुपयांना विकला जाईल आणि तो पाकिस्तानचा सर्वात महागडा खेळाडू बनेल.”
पाकिस्तानी खेळाडूंनी खेळलीय आयपीएल
आयपीएलच्या पहिल्या हंगामात म्हणजे २००८ मध्ये इतर देशांप्रमाणे पाकिस्तान संघाचे खेळाडूही सहभागी होत होते. पहिल्याच हंगामात एकूण ११ पाकिस्तानी खेळाडू वेगवेगळ्या आयपीएल फ्रँचायझीचा भाग होते. त्या हंगामात शाहिद आफ्रिदी पाकिस्तानचा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्याला डेक्कन चार्जर्सने २.७१ कोटींना विकत घेतले होते. तर शोएब अख्तर कोलकाता नाईट रायडर्सचा भाग होता, ज्यांनी त्याला १.७ कोटींना खरेदी केले होते.
परंतु त्याचवर्षी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतावर हल्ला केला होता, जो २६/११ चा हल्ला म्हणून ओळखला जातो. या घटनेनंतर आयपीएलमधून कायमची पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी घालण्यात आली होती.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल म्हणजे पैसे छापण्याचीच मशीन; मीडिया हक्कांमधून बीसीसीआय होणार मालामाल
भारत विश्वचषकातून बाहेर, पण आयसीसीच्या वनडे क्रमवारीत खेळाडूंची मोठी झेप; कर्णधार मितालीही फायद्यात
पदार्पणातच आयुष बदोनीने गाजवलं आयपीएलचं मैदान; धवन, वॉर्नरसारख्या दिग्गजांच्या यादीत मिळवलं स्थान