नवी दिल्ली – जगभरात सध्या कोरोना विषाणूची दहशत आहे. या विषाणूची लागण होण्याव्यतिरिक्त लॉकडाऊनमुळेही अनेक लोकांचे हाल होत आहेत. अशावेळी दानशूर आणि सामाजिक कार्याची आवड असलेले अनेक देशातील नागरिक पुढे येऊन गरीब आणि गरजू लोकांना मदत करत आहेत.
पाकिस्तानमध्येही माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी घरोघरी जाऊन शिधावाटप करत आहे. त्यातच आता माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याने देखील या विषाणूविरूद्धच्या लढ्यात एक महत्वाची गोष्ट मदत म्हणून दान केली आहे. पाकिस्तानचा टेनिसपटू ऐसम-उल कुरेशी याने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे.
अख्तरने दान केली शाहरुखची ‘ती’ अनमोल भेट…
ऐसम याने अख्तरसोबतचा एक फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवर टाकला आहे. त्यासोबत त्याने कॅप्शनमध्ये शोएबने दिलेल्या भेटवस्तूबाबत लिहिले आहे, “शाहरुख खान याने 15 वर्षांपूर्वी तुम्ही सामनावीर ठरला होता, तेव्हा स्वतःची सही केलेले हे खास हेल्मट तुम्हाला भेट म्हणून दिले होते. ते हेल्मेट दान केल्याबद्दल अख्तर भाईंचे आभार” असे ऐसम याने म्हटले आहे.
अख्तरने खास कारणासाठी केले हेल्मेट दान…
ऐसम याचे हे ट्विट शोएब अख्तर याने रिट्विट केले आहे. तसेच त्याने आपल्या कृतीचे समर्थन देखील केले आहे. यात त्याने, “हे दान एका खास कारणासाठी आहे” असे म्हटले आहे.
‘या’ कारणासाठी शाहरुखने अख्तरला दिले होते खास हेल्मेट
शोएब अख्तर हा 2008 मध्ये शाहरुख खानच्या कोलकाता नाइट रायडर्स या टीमचा खेळाडू होता. त्यावेळी त्याने दिल्ली विरुद्ध झालेला सामना एकहाती जिंकून दिला होता. दिल्ली डेअरडेव्हिल्स या संघाविरुद्ध शोएबचा तो पहिला सामना होता. या सामन्यात अख्तरने शानदार कामगिरी केली होती.
अवघ्या 11 धावांत 4 फलंदाजांना अख्तरने धाडले होते तंबूत…
त्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोलकाता संघाने अवघ्या 133 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करणे चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या दिल्ली संघाला अवघड नव्हते. तशी त्यांनी सुरुवात देखील केली होती. परंतु अख्तरच्या भेदक माऱ्यापुढे दिल्लीच्या फलंदाजांने अक्षरशः नांग्या टाकल्या आणि दिल्ली संघाचा डाव 110 धावांवर आटोपला. या सामन्यात शोएब अख्तरने 3 षटकांत फक्त 11 धावा देऊन चार महत्त्वपूर्ण बळी टिपले होते. त्याच्या कामगिरी खुश होऊन शाहरुख खान याने तेव्हा त्याला स्वतःची स्वाक्षरी असलेले हेल्मेट भेट म्हणून दिले होते.
You're welcome @aisamhqureshi . Its going for a great cause. https://t.co/LmlYKf8ejb
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) May 16, 2020
लोकांनी घरातच रहावे… शोएब अख्तरचे आवाहन
अख्तरने आपली ही खास भेट कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी मदत म्हणून दिली आहे. यासोबतच त्याने सर्व लोकांना आवाहन केले आहे. कोरोना विषाणूमुळे सध्या संपूर्ण जग एकप्रकारे बंदीशाळा बनले आहे. लाखो लोकं त्यांच्याच घरात कैद झाले आहेत. मात्र, सध्या हा एकच पर्याय असल्याने शोएब अख्तर यानी देखील, ‘प्रत्येक नागरिकाने आपल्या घरात रहावे आणि सुरक्षित राहावे’ असे आवाहन केले आहे. Shoaib Akhtar donates Shah Rukh Khan signed KKR helmet in fight against coronavirus.
ट्रेडिंग घडामोडी-
फक्त महाराष्ट्रीय खेळाडूंना घेऊन केलेली टीम इंडियाची वनडे ड्रीम ११
सचिनला १९०वर बाद दिले असते तर मला दिले नसते जाऊ हाॅटेलवर
एका रनआऊटने झाले होते मैदानात दंगे, ६५ हजार प्रेक्षकांना स्टेडियमबाहेर काढून घेतला होता सामना