पाकिस्तानचा कर्णधार बाबार आजम गेल्या काही दिवसात चांगल्या फॉर्ममध्ये दिसला आहे. त्याच्या कामगिरीमुळे त्याची तुलना सातत्याने भारताचा कर्णधार विराट कोहलीबरोबर होत असते. अनेक दिग्गज खेळाडूंनीही या दोन खेळाडूंची तुलना केली आहे. आता याबद्दल पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही आपले मत व्यक्त केले आहे.
शोएब अख्तरचे असे मत की, बाबर आजमकडे महान खेळाडू होण्याची सर्व क्षमता आहे, पण त्याला कोहलीप्रमाणे सातत्यपूर्ण धावा करायची गरज आहे. सोबत शोएब अख्तरनेही सांगितले की, बाबरची तुलना विराट सोबत फार लवकर होत आहे. यासाठी त्याला किमान 20 ते 30 हजार धावा कराव्या लागतील. तेव्हा कुठे त्याची विराट सोबत तुलना होऊ शकते.
स्पोर्ट्सकिडाला दिलेल्या मुलाखतीत शोएब अख्तर म्हणाला की, ‘बाबर आझम अशा वेळी क्रिकेट खेळत आहे, जेव्हा वेगवान गोलंदाजांची क्रिकेटमध्ये कमतरता आहे. त्याचबरोबर विराट कोहलीशी तुलना खूप लवकर होत आहे, त्याला क्रिकेट कारकिर्दीमध्ये 20 ते 30 हजार धावा करु द्या, जसे विराटने केल्या आहेत, मग त्यांची तुलना करा.’
परंतु शोएब अख्तरने कबूल केले की, गेल्या काही वर्षांत बाबर आजमने आपल्या फलंदाजीवर कठोर परिश्रम केले आहेत आणि एक उत्तम खेळाडू होण्याचे गुण त्याच्यात आहेत.
शोएब अख्तर म्हणाला की, ‘बाबर आजम अजूनही शिकत आहे. याआधी त्याला एकदिवसीय संघाबाहेर ठेवण्यात आले होते. परंतु त्याने कठोर परिश्रम घेतले आणि तो एकदिवसीय संघातील नियमित खेळाडू बनला. बर्याच लोकांनी त्याला टी20 क्रिकेटचा खेळाडू मानले नाही, पण आता तो टी20 क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी करत आहे. एका दिवसात सर्व काही बदलत नाही. 2009-10 मध्ये विराट कोहली हा काहीच नव्हता. पण त्यानंतर विराट कोहलीने आपला वेग बदलला, त्याने त्याच्या खेळावर आणि तंदुरुस्तीवर कठोर परिश्रम केले, त्यामुळे तो आज इतका यशस्वी झाला आहे.’
नुकतीच बाबर आझम 14 एकदिवसीय शतके ठोकणारा सर्वात वेगवान खेळाडू ठरला आहे. बाबर आझमने 14 एकदिवसीय शतकांकरिता 81 डाव खेळले आहेत. पण विराट कोहलीने यासाठी 103 डाव खेळले होते. कसोटीत बाबर आझमने 42.5 च्या सरासरीने आणि एकदिवसीय सामन्यात 56.9 च्या सरासरीने धावा केल्या, तर टी 46.8 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तर दुसरीकडे, विराट कोहली हा जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे, ज्याच्या तीनही स्वरूपात सरासरी पन्नासपेक्षा जास्त सरासरी आहे. तसेच विराटच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७० शतके आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
पंतचे संघात जोरदार स्वागत तर केले, पण ‘ते’ ट्विट केल्याने रवी शास्त्री होतायेत जोरदार ट्रोल
तेव्हा शोएब अख्तर अनुष्काला म्हणाला होता, ‘विराट कर्णधार बनून मोठी चूक करत आहे’
विराटचा ‘तो’ फोटो शेअर करत २०१८ च्या इंग्लंड दौऱ्यातील आठवणींना उजाळा; दिले मन जिंकणारे कॅप्शन