पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टींनी चर्चेत येत असतो. विचित्र करामती आणि विधानांनी तो सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. यातच आता तो सध्या सौदी अरबमध्ये आहे. येथे तो हज यात्रेसाठी आला आहे. त्याची ही यात्रा कशी झाली हे चाहत्यांना कळावे यासाठी त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेयर केले आहेत. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
या यात्रेत दानवाला दगड मारण्याची एक प्रथा आहे. याच प्रथेत शोएबने सहभागी होत त्याचा व्हिडिओही काढला असून तो शेयर केला आहे. त्याने याला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले, ‘दानवाला मारलेल्या दगडाचा वेग नेमका काय होता हे माहित नाही, मात्र माझ्या रागाचा वेग ताशी १०० किमीसारखा होता हे नक्की.’
या व्हिडिओच्या सुरूवातील शोएबने म्हटले, याला सोडायचे नाही. तो मागील आठवड्यातच सौदी अरबच्या पाहुण्याच्या भुमिकेत हज यात्रेसाठी पोहोचला आहे.
View this post on Instagram
शोएबने २००२मध्ये ताशी १०० किमीच्या वेगाने चेंडू टाकला होता. एवढ्या जलद वेगाने चेंडू टाकणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला होता. हा चेंडू त्याने लाहोर येथे झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सामन्यात टाकला होता.
शोएबने १९९७मध्ये पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने पहिला कसोटी सामना वेस्ट इंडिज विरुद्ध खेळला आहे. तर १९९८मध्ये वनडेत पदार्पणाचा सामना झिम्बाब्वे विरुद्ध खेळला आहे. त्याने कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना न्यूझीलंड विरुद्ध पल्लेकेले येथे खेळला आहे. हा वनडे सामना असून त्यामध्ये त्याने ९ षटके टाकताना ७० धावा देताना १ विकेट घेतली होती. त्याने ब्रेंडन मॅक्युलम (Brendon McCullam) याला त्रिफळाचीत केले होते.
शोएबने ४६ कसोटी सामन्यात १७८ विकेट्स, १६३ वनडे सामन्यात २४७ विकेट्स आणि १५ टी२० सामन्यात १९ विकेट्स घेतल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑटोग्राफ मागायला आलेल्या मुलीवरच झाले गावसकरांना प्रेम, वाचा त्यांची प्रेमकहाणी
रोहितची कॅप्टनसी टीम इंडियासाठी ‘लकी’! इंग्लंडमध्ये इंग्लंडलाच चारली धूळ
सामने जिंकूनही भारतीय संघाचं टेन्शन दूर होईना! विश्वचषकापूर्वी भारतीय संघात ‘या’ ५ उणिवा