---Advertisement---

‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ ने निवडले भारत- पाकिस्तानातील टॉप १० खेळाडू; ‘या’ दिग्गजांना नाही संधी

On: मंगळवार, जून 9, 2020 4:58 PM
---Advertisement---

मुंबई । कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्यामुळे क्रिकेटच्या मालिका अनिश्चित काळासाठी स्थगित केल्या आहेत. याच दरम्यान, काही आजी-माजी खेळाडू सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला आवडता संघ निवडत आहेत. दरम्यान, ‘रावळपिंडी एक्सप्रेस, नावाने प्रसिद्ध असलेल्या शोएब अख्तरने नुकतेच भारत आणि पाकिस्तान संघातील टॉप-10 खेळाडू निवडले आहे. 

अख्तरने निवडलेल्या या टॉप-10 खेळाडूंमध्ये चार भारतीयांचा समावेश आहे. मात्र, या यादीत रोहित शर्मा, विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश नाही.

तसेच वसीम अक्रम, वकार युनिस, सकलेन मुश्ताक या तीन गोलंदाजांना निवडले. फलंदाज म्हणून सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग सारख्या धडाकेबाज खेळाडूंनाही निवडले. पाकिस्तानचे सईद अन्वर, इंझमाम उल हक यांचे नाव देखील या टॉप -10 यादीत आहे. अब्दुल रजाक आणि युवराज सिंग या दोन अष्टपैलू खेळाडूंना स्थान दिले.

अख्तरने असे टॉप-10 खेळाडू निवडले आहेत. ज्यांच्यासोबत त्याने क्रिकेट खेळले आहे. सद्यस्थितीत क्रिकेट खेळत असलेल्या एकाही खेळाडूंना त्याने निवडले नाही. शोएब अख्तर सौरव गांगुलीचे कौतुक करताना म्हणाला की, “सौरव गांगुलीच्या येण्यानेच असे वाटू लागले की, भारतीय संघ पाकिस्तानला हरवू शकेल आणि नेमके तसे घडलेही.”

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध बिघडल्यामुळे 2012 नंतर दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळवण्यात आली नाही. मात्र, हे दोन्ही संघ आयसीसीच्या स्पर्धेत खेळताना दिसून येतात. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात क्रिकेटच्या मालिका व्हाव्यात, अशी इच्छा शोएब अख्तरने यापूर्वी व्यक्त केली होती.

शोएब अख्तरने निवडलेले भारत पाकिस्तान संघातील टॉप टेन एकदिवसीय खेळाडू :

सचिन तेंदुलकर, सईद अनवर, इंजमाम उल हक, राहुल द्रविड़, वीरेंद्र सहवाग, अब्दुल रज्जाक, युवराज सिंह, सकलेन मुश्ताक, वसीम अकरम, वकार यूनिस.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---