पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमान आहे, परंतु आता ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, पीसीबीनंही काही अटींसह हे मान्य केलंय. पीसीबीनं रेव्हेन्यूमध्ये जास्त वाटा आणि भारतात होणाऱ्या आयसीसी स्पर्धांसाठी हायब्रीड मॉडेलची मागणी केली. यावर शोएब अख्तर म्हणाला की, पीसीबीची ही मागणी ठीक आहे, मात्र पाकिस्ताननं भारतात जाऊन तिथे त्यांचा पराभव करावा.
शोएब अख्तर एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीवर म्हणाला, “तुम्हाला होस्टिंगचे अधिकार आणि कमाईसाठी पैसे दिले जात आहेत आणि ते ठीक आहे. हे सर्व आम्ही समजतो. पाकिस्तानची भूमिकाही योग्य आहे. त्यांनी एक मजबूत भूमिका राखली पाहिजे. आम्ही आमच्या देशात चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करण्यास सक्षम आहोत आणि ते यायला तयार नाहीत, तर हा एक चांगला निर्णय आहे.”
अख्तर पुढे म्हणाला की, “भविष्यातील आयसीसी स्पर्धांमध्ये पीसीबीनं पाकिस्तानचा संघ भारतात पाठवावा आणि असा संघ तयार करावा जो भारताला भारतात पराभूत करू शकेल.” अख्तर म्हणाला, “भविष्यात भारतात खेळण्याच्या दृष्टीनं आपण मैत्रीचा हात पुढे केला पाहिजे आणि तिकडे जायला हवे. भारतात खेळा आणि त्यांना तिथे जाऊन हरवा यावर माझा नेहमीच विश्वास आहे. मला वाटतं, हायब्रिड मॉडेलवर आधीच करार झाला होता.”
चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होणार आहे. यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत ही स्पर्धा पाकिस्तानातच व्हावी, यावर पाकिस्तान ठाम होता. मात्र, भारत यासाठी तयार नव्हता. आता स्पर्धा हायब्रिड मॉडेल अंतर्गत खेळवण्याचं जवळपास निश्चित झालं आहे.
हेही वाचा –
भारतीय संघ अजूनही WTC फायनलमध्ये कसा पोहचू शकतो? न्यूझीलंडच्या पराभवामुळे सर्व समीकरणं बदलली
काय सांगता! 95 चेंडूत केवळ 5 धावा दिल्या, या गोलंदाजानं मोडला उमेश यादवचा मोठा रेकॉर्ड
दुसऱ्या कसोटीपूर्वी बुमराह-कोहली सराव सामना खेळले नाहीत, कारण जाणून घ्या