पाकिस्तानचा दिग्गज वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला जागतिक क्रिकेटमधील आपल्या घातक गोलंदाजीसाठी ओळखले जाते. त्याने जगातील अनेक धडाकेबाज फलंदाजांना तंबूचा रस्ता धरायला भाग पाडले होते. यासोबतच अख्तरची कारकीर्द वादांनी भरलेली राहिली. परंतु ड्रग्ज किंवा कोणत्याही अंमली पदार्थांच्या सेवनाबाबत त्याच्या कारकिर्दीवर कोणताही डाग लागला नाही. अशामध्ये ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ अख्तरने नुकताच ड्रग्जबाबत मोठा खुलासा केला आहे.
अख्तरने खुलासा केला की, त्याला वेगवान चेंडू टाकण्यासाठी ड्रग्जचा वापर करण्यासाठी सांगण्यात आले होते. परंतु त्याने याला नकार दिला होता. त्याने नाव न घेता हा दावा केला की, एका जागतिक दर्जाच्या पाकिस्तानी क्रिकेटपटूची कारकीर्द ड्रग्जमळे संपुष्टात आली होती.
अख्तरने अँटी नारकोटिक्स फोर्सच्या वार्षिक ड्रग्ज बर्निंग कार्यक्रमात म्हटले, “जेव्हा मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती, तेव्हा मी खूप वेगवान गोलंदाजी करू शकत नव्हतो. त्यावेळी मला सांगण्यात आले होते की, १०० किमी प्रति तास ही चांगली गती मिळवण्यासाठी मला ड्रग्ज घ्यावे लागेल. परंतु मी हे घेण्यास नकार दिला होता.”
अख्तरने पाकिस्तान संघाकडून ४६ कसोटी सामने, १६३ वनडे सामने आणि १५ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने २५.६९ च्या सरासरीने १७८ विकेट्स घेतल्या आहेत. वनडेत त्याने २४.९७ च्या सरासरीने २४७ विकेट्स घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त त्याने टी२०त २२.७३ च्या सरासरीने १९ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘ही’ जर्सी घालून टीम इंडिया उतरणार मैदानात, शिखर धवनने फोटो केला शेअर
ब्रेकिंग! धोनीचे मार्गदर्शक देवल सहाय यांचे निधन; वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
‘आम्ही एकाच कॉलेजमधील,’ रवी शास्त्रींकडून श्रेयस अय्यरसोबतचे फोटो शेअर; टीम इंडियासाठी मोठे संकेत
ट्रेंडिंग लेख-
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात खेळलेल्या लक्ष्मणच्या पाच ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ खेळ्या
‘या’ ३ भारतीय शिलेदारांचा असू शकतो अखेरचा ऑस्ट्रेलिया दौरा; दुसरे नाव आश्चर्यकारक
बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका वनडेत सर्वाधिक षटकार ठोकणारे ३ भारतीय फलंदाज, दुसरे नाव अनपेक्षित