दक्षिण आफ्रिकाचा यष्टीरक्षक फलंदाज एबी डिविलियर्स याने आपल्या फलंदाजीने भल्याभल्या गोलंदाजांना रडकुंडीला आणले आहे. मात्र पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याला ही गोष्ट मान्य नाही. याउलट डिविलियर्स पाकिस्तानच्या एका गोलंदाजापुढे रडायला सुरु करत असल्याचा दावा त्याने केला आहे. तसेच भारतीय दिग्गज व्हिव्हिएस लक्ष्मण यांनाही त्या गोलंदाजांपुढे संघर्ष करताना पाहिल्याचे त्याने सांगितले आहे.
स्पोर्ट्स टुडेशी बोलताना अख्तर म्हणाला की, “वसीम अक्रमपेक्षाही मोठा गोलंदाज, ज्याला मी गोलंदाजी करताना पाहिले आहे; तो म्हणजे ‘मोहम्मद आसिफ’. मी वास्तवात आसिफच्या गोलंदाजीचा सामना करताना मोठमोठ्या फलंदाजांना रडकुंडीला आलेले पाहिले आहे. लक्ष्मणनेही एकदा म्हटले होते की, मी या गोलंदाजांचा सामना कसा करू. केवळ लक्ष्मण नव्हे तर, डिविलियर्सनेही आशियाई कसोटी चॅम्पियनशीपमध्ये खरोखरच आसिफपुढे रडायला सुरु केले होते.”
जसप्रीत बुमराहचे केले कौतुक
तसेच पुढे बोलताना अख्तरने भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची प्रशंसा केली. आसिफनंतर बुमराह हा सर्वात स्मार्ट गोलंदाज असल्याचे त्याने सांगितले आहे. याविषयी बोलताना अख्तर म्हणाला की, “माझ्या मते आसिफनंतर सध्या क्रिकेट खेळत असलेल्या गोलंदाजांमध्ये बुमराह सर्वात चपळ आणि शानदार गोलंदाज आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांनी बुमराहच्या फिटनेसवर शंका घेतली होती. पण असे अजिबात नाही. मीदेखील त्याला अनुभवले आहे. त्याचा बाउंसर खूप वेगाने येत असतो.”
मोहम्मद आसिफची क्रिकेट कारकिर्द
मोहम्मद आसिफ याच्या कारकिर्दीविषयी बोलायचे झाले तर, त्याची कारकिर्द जास्त मोठी राहिली नाही. या ३८ वर्षीय गोलंदाजाने २००५ साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर ऑगस्ट २०१० मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा सामना खेळला. दरम्यान त्याला फक्त २३ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. यात त्याने १०६ विकेट्स घेतल्या. तर ३८ वनडे सामन्यात ४६ विकेट्स आणि ११ टी२० सामन्यात १३ विकेट्सची कामगिरी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
विलियम्सनचा शतकी तडाखा! स्टिफन फ्लेमिंगच्या ‘या’ विक्रमालाही दिला धक्का
केन विलियम्सनचा पुन्हा शतकी धमाका! ‘हा’ विक्रम करत विराटलाही टाकलंय मागे