आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान या शेजारी राष्ट्रांमधील सामना हा नेहमीच अटीतटीचा होतो. भारतीय संघाकडून असे अनेक क्रिकेटपटू राहिले आहेत ज्यांनी या सामन्यात निर्णय कामगिरी केली आहे. सचिन तेंडुलकर याने आपल्या जवळपास 25 वर्षांच्या कारकीर्दीत अनेक वेळा पाकिस्तानला हरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच मागील दहा वर्षात विराट कोहली हा पाकिस्तानविरुद्ध नेहमीच चमकदार कामगिरी करताना दिसला आहे. याबाबत नुकतेच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने वक्तव्य केले.
शोएबने नुकतीच एक मुलाखत दिली यामध्ये त्याने अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडले. विराट कोहली व सचिन तेंडुलकर यांच्या बद्दल बोलताना तो म्हणाला,
“विराट कोहली हा सचिन तेंडुलकरसारखाचआहे. त्यानेही खूप धावा केल्या आहेत. मला वाटते की, विराट आणखी किमान सहा वर्षे खेळून सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडीत काढेल. कोहलीमध्ये तो विक्रम मोडण्याची क्षमता नक्कीच आहे.”
सध्या सचिन तेंडुलकर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शंभर शतकांसह पहिल्या क्रमांकावर येतो. त्यानंतर विराटने 76 शतके झळकावली आहेत. विराटचा फॉर्म व फिटनेस पाहता विराट किमान चार-पाच वर्षे खेळताना दिसण्याची शक्यता आहे.
विराट नुकत्याच संपलेल्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर किंवा कसोटी मालिकेतील दोन सामने खेळला. वनडे मालिकेसाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला होता. मात्र, पहिल्या सामन्यात त्याने फलंदाजी केली नाही. उर्वरित दोन सामन्यात त्याला विश्रांती दिली गेली. आता विराट थेट आशिया चषकात खेळताना दिसेल. आशिया चषक व वनडे विश्वचषक या दोन्ही स्पर्धांमध्ये त्याची कामगिरी निर्णायक ठरेल.
(Shoaib Akhtar Speaks On Virat Kohli And Sachin Tendulkar)
महत्वाच्या बातम्या-
पृथ्वी शॉचे कमबॅक फसले! दुखापतीमुळे बराच काळ राहणार बाहेर
BREAKING: वर्ल्डकपआधीच ऑस्ट्रेलियाला दुहेरी धक्का! दोन हुकमी एक्के जखमी