मागील काही दिवसांपासून पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आपल्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत आहे. या व्हिडिओंमध्ये अनेकवेळा अशाप्रकारचे प्रश्न उपस्थित केले जातात. जे नेहमी चर्चेचा विषय ठरतात.
अशाच प्रकारे अख्तरने नुकतेच नवीन काहीतरी करण्याच्या उद्देशाने व्हिडिओऐवजी ऑडिओमार्फत चर्चा केली. हा ऑडिओ त्याने इंग्लंडचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू अँड्रू फ्लिंटॉफसोबत बनवला. फ्रॅडी या नावाने प्रसिद्ध असलेला फ्लिंटॉफ आणि अख्तर हे समकालीन खेळाडू राहिले आहेत.
या दरम्यान अख्तरने ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर फलंदाज मॅथ्यू हेडन याची २००३ च्या विश्वचषकातील सामन्याची आठवण सांगितली. तो म्हणाला की, एकदा हेडन आणि माझ्यामध्ये भांडण झाले होते. त्यानंतर आमचे एकमेकांशी कधीच पटले नाही.
“हेडनबरोबर माझे भांडण झाले होते. तो विश्वचषकाचा पहिला सामना होता. आम्ही त्यामध्ये पराभूत झालो होतो. त्यानंतर मी आणि हेडन कधीही एकमेकांशी बोललो नाही,” असेही अख्तर म्हणाला.
“त्याला माझ्याबद्दल काहीच माहिती नव्हते. त्याने मला सी-ग्रेड कलाकार (C Grade Artist) आणि कमी दर्जाचा वेगवान गोलंदाज म्हटले होते. त्यामुळे मी त्याला म्हटले की, हेडन मी तुला विश्वचषकात दाखवून देईल. दुर्दैवाने आम्ही हा सामना गमावला. तसेच आम्हाला नाश्ता करण्यासाठी सकाळी खूप लवकर उठावे लागले होते, हे सुद्धा आमच्यासाठी वाईट होते,” असेही अख्तर म्हणाला.
अख्तर पुढे म्हणाला की, “मी आणि हेडन (Matthew Hayden) एकटे उभे होतो आणि नाश्ता करत होतो. तसेच फक्त बोलत होतो की तेवढ्यात आमच्यात भांडण सुरु झाले. खरंतर हे एक वाईट भांडण होते. देवाच्या कृपेने लोक आले आणि आम्हाला दूर केले.”
अख्तरने पुढे येऊन मान्य केले की, त्याने हेडनला ५वेळा वेगाने चेंडू टाकला होता. परंतु त्यावेळी हेडन जागेवरचा हललाही नाही.
“हेडन आणि जस्टीन लँगर (Justin Langer) मला खूप चिडवत होते. ते मला वेगाने, आणखी वेगाने गोलंदाजी करायला सांगत होते. मेलबर्न आणि पर्थ कसोटी सामन्यांमध्ये मी माझी बरीच शक्ती वाया घालविली,” असेही अख्तर पुढे म्हणाला.
“मी त्याला अतिशय वाईट पद्धतीने चेंडू टाकले होते. मी हेडनला ३ षटकांमध्ये ५वेळा वेगात चेंडू शरिराव मारले होते. परंतु त्याने एक इंचही हलला नाही. हे पाहून मी आश्चर्यचकीत झालो,” असेही अख्तर त्या भांडणाबद्दल बोलताना म्हणाला.
ट्रेंडिंग घडामोडी-
-तुम्हाला क्रिकेटर व्हायचं आहे तर हे आहे रोहित शर्मा ब्रॅंड एँबेसेडर असलेल्या कंपनीचं उत्तरं
-आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे ५ कर्णधार
-११ वर्षांतंच अख्तरची कारकिर्द संपली असती, एका भारतीयाने केलेल्या मदताने झाला महान गोलंदाज