---Advertisement---

क्रिकेटला मिळाला पहिला १०० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळणार खेळाडू

On: सोमवार, जुलै 2, 2018 2:55 PM
---Advertisement---

हरारे | सोमवारी(१ जूलै)  पाकिस्तान विरुद्ध आॅस्ट्रेलिया दुसऱ्या टी२० सामन्यात एक खास विक्रम झाला. पाकिस्तानचा शोएब मलिक हा आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये १०० सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरला.

या सामन्यात त्याला विशेष कामगिरी करता आली नाही. तो केवळ १३ धावांवर धावबाद झाला.

मलिकने १०० टी२० सामन्यात २२.१४च्या सरासरीने २०३९ धावा केल्या आहेत. त्यात त्याच्या २८ विकेट्सचाही समावेश आहे.

दुसऱ्या स्थानावर असलेल्या शाहिद आफ्रिदीने टी२०मध्ये ९९ सामने खेळले आहेत. तो शेवटचा टी२० सामना विंडीज विरुद्ध विश्वएकादश हा गेल्या महिन्यात खेळला. तो त्याचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना होता.

कसोटीमध्ये पहिला १००वा सामना हा कोलिन कोवड्राय यांनी ११ जूलै १९६८साली खेळला होता. वनडेत पहिला १००वा सामना खेळण्याचा मान आॅस्ट्रेलियाच्या अॅलन बाॅर्डर यांच्या नावावर आहे. त्यांनी १९ जानेवारी १९८५ हा सामना खेळला होता.

महिलांच्या टी२०मध्ये जेनी गन्स (१०४) आणि सूझी बेट्स (१०१) यांनी १०० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत.

 आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू-

१००- शोएब मलिक

९९- शाहिद आफ्रिदी

९०- एमएस धोनी

८३- मोहम्मद हफिझ

८२- उमर अकमल

८१- रोहित शर्मा / राॅस टेलर

महत्त्वाच्या बातम्या- 

टीम इंडियामध्येही दिसणार पंड्या ब्रदर्स

महिला हॉकी विश्वचषक: भारतीय संघाचे नेतृत्व राणी रामपालकडे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment