मुंबई । कोरोना व्हायरसमुळे भारताची स्टार टेनिस खेळाडू सानिया मिर्झा आणि तिचा पती शोएब मलिक हे गेल्या 5 महिन्यापासून दूर आहे. सध्या सानिया तिचा मुलगा इजहानसोबत हैदराबादमध्ये आहे. भारतात लॉकडाउन लागू असल्याने ती शोएब मलिकला भेटू शकली नाही. आता स्वतः शोएब मलिक भारतात पत्नी सानिया आणि मुलगा इजहान भेटण्यासाठी येणार आहे.
पाकिस्तानचा क्रिकेट संघ याच महिन्यात इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या दौऱ्यावर जाण्यापूर्वी शोएब मलिक भारतात सानिया मिर्झाला भेटण्यासाठी येणार आहे.
याची माहिती पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वासिम खान यांनी दिली. ते म्हणाले, “शोएब गेल्या पाच महिन्यांपासून आपल्या परिवाराला भेटू शकला नाही. लॉकडाऊनमध्ये शोएबला भारतात येण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.”
त्यामुळे शोएब इंग्लंड दौऱ्यादरम्यान पाकिस्तान संघात २४ जूलैला सामील होईल. याबद्दल खान म्हणाले, ‘आम्ही इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाशी बोललो. त्यांनी परिस्थिती समजून घेतली आणि 24 जुलै रोजी शोएबला देशात प्रवेश करण्यास सहमती दर्शविली. नक्कीच शोएब संघात येण्याआधी यूके सरकारच्या सर्व धोरणांचे पालण करेल.’
याआधी सानिया एका मुलाखतीत म्हणाली होती की, तिचा मुलगा इजहान हा त्याच्या वडिलांना भेटण्यासाठी खूप आतुर आहे. पिता-पुत्र एकमेकांपासून दूर राहणे अवघड आहे. कारण इजहान हा खूपच लहान आहे. मला माहित नाही की, ते दोघे एकमेकांना कधी भेटतील. आम्ही नेहमी सकारात्मक विचार करतो. शोएबची आई ही 65 वर्षांची आहे. सियालकोट येथे ती एकटीच राहते. त्यामुळे शोएबला तिची जास्त गरज आहे. आम्ही तेच केले जे आम्हाला योग्य वाटले.
3 कसोटी आणि 3 टी20 सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तान संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी पाकिस्तानचा 29 सदस्यीय संघ 28 जून रोजी मँचेस्टरकडे रवाना होईल. डर्बीशायर येथे 14 दिवस पाकिस्तानचा संघ एकांतवासमध्ये राहील. या एकांतवासमध्ये खेळाडूंना सराव करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे.
शोएब या दौऱ्यात टी20 मालिकेत खेळताना दिसू शकतो. कारण कसोटी आणि वनडेमधून त्याने आधीच निवृत्ती घेतली आहे. पण टी20मध्ये तो अजून सक्रिय आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
बांगलादेशच्या पहिल्या कसोटी विजयाचा साक्षीदार असलेल्या क्रिकेटपटूला झाली कोरोनाची बाधा
बीसीसीआयने या संघाला अजून दिले नाही बक्षीसाचे १ कोटी रुपये; या खेळाडूने उपस्थित केला प्रश्न
विराटला प्रपोज करणाऱ्या या महिला क्रिकेटपटूला खेळायचंय आरसीबीकडून