पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश पहिला टी२० सामना पाकिस्तानने जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात ३७वर्षीय शोएब मलिकने ५८ धावांची नाबाद खेळी केली होती. याबरोबर त्याने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.
२००० सालापुर्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेला आणि चालु दशकात क्रिकेट खेळलेला तो एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे. मलिकने १४ ऑक्टोबर १९९९ रोजी विंडीजविरुद्ध वनडेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्यानंतर १९९०, २०००, २०१० आणि २०२० अशा चार दशकात तो क्रिकेट खेळला आहे.
२०१० हे दशक ३१ डिसेंबर २०१९ रोजी संपले तर १९९०चे दशक संपण्यापुर्वीच त्याने ऑक्टोबर १९९९ला पदार्पण केले होते. त्यामुळे एक आगळावेगळा विक्रम त्याच्या नावावर झाला आहे.
मलिकबरोबर समकालिन असलेल्या युवराज सिंग आणि ख्रिस गेलने क्रिकेटला अलविदा केला आहे तर हरभजन सिंग (पदार्पण- २५ मार्च १९९८) आणि मार्लन सम्युअल (पदार्पण- ०४ ऑक्टोबर २०००) यांनी अजून आपल्या निवृत्तीची घोषणा केलेली नाही. परंतु त्यांना आता आंतरराष्ट्रीय संघात संधी मिळणे जवळपास अशक्यच दिसत आहे.
शोएब मलिकला समकालीन क्रिकेटर-
हरभजन सिंग- पदार्पण- २५ मार्च १९९८ ( अजून निवृत्ती जाहीर केली नाही.)
मार्लन सॅम्युएल- पदार्पण- ०४ ऑक्टोबर २००० ( अजून निवृत्ती जाहीर केली नाही.)
ख्रिस गेल- पदार्पण- ११ सप्टेंबर १९९९ (निवृत्त)
युवराज सिंग- ३ ऑक्टोबर २००० (निवृत्त)