---Advertisement---

शोएब मलिकचा टी२० विश्वचषकासाठी पाकिस्तान संघात समावेश, ‘या’ खेळाडूऐवजी मिळाले स्थान

On: शनिवार, ऑक्टोबर 9, 2021 11:30 PM
---Advertisement---

पाकिस्तान संघाने अनुभवी अष्टपैलू शोएब मलिकची टी२० विश्वचषक संघात निवड केली आहे. पाकिस्तानने टी -२० विश्वचषकासाठी निवडलेल्या संघातून फलंदाज सोहेब मकसूद दुखापतीमुळे बाहेर पडला. त्यामुळे त्याच्या जागी मलिकला समाविष्ट केले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शनिवारी (९ ऑक्टोबर) जारी केलेल्या निवेदनात या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे मकसूद स्पर्धेबाहेर झाला आहे.

मुख्य निवडकर्ते मुहम्मद वसीम यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘सोहेब आयसीसीच्या पुरुषांच्या टी-२० विश्वचषकातून बाहेर पडल्याने निराश झाला आहे, कारण त्याने या स्पर्धेसाठी कठोर परिश्रम केले होते आणि सध्या तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. आम्हाला त्याच्याबद्दल खूप वाईट वाटत आहे. पण दुखापती हा खेळाचा भाग आहे आणि मला खात्री आहे की तो लवकरच भविष्यातील सामन्यांसाठी उपलब्ध होईल आणि लवकरच पूर्णपणे बरा देखील होईल.’

निवेदनात पुढे म्हटले आहे की, ‘संघ व्यवस्थापनाशी चर्चा केल्यानंतर आम्ही शोएब मलिकला त्याच्या जागी समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. मला खात्री आहे की शोएबचा अनुभव संपूर्ण संघासाठी उपयुक्त ठरेल.’

मध्यंतरी, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणारी एकदिवसीय मालिका अचानक स्थगित झाली होती. न्यूझीलंड संघाने सूरक्षेच्या कारणाने दौऱ्यातून माघार घेत असल्याचे सांगितले होते. या पाठोपाठ इंग्लंड क्रिकेट संघानेही पाकिस्तान दौरा रद्द केला. यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला होता. कारण ते स्वतः पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू राहिले आहेत. न्यूझीलंड आणि इंग्लंड संघाने दौरा रद्द केल्याने संपूर्ण जगात पाकिस्तानची नाचक्की झाली होती.

त्यानंतर ऑस्ट्रेलियाने देखील पाकिस्तान दौरा करण्याबाबत शाशंक असल्याचे सांगितले होते. यातच इम्रान खान यांनी पाकिस्तान क्रिकेट संघाला आगामी टी -२० विश्वचषकात भारताविरुद्ध निर्भयपणे खेळण्याचा सल्ला दिला आहे. हा विश्वचषक पाकिस्तानसाठी आता प्रतिष्ठेचा बनला आहे.

टी २० विश्वचषकासाठी पाकिस्तान संघ:
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरीस रौफ, हसन अली, इमाद वसीम, मोहम्मद हाफिज, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, सरफराज अहमद , शाहीन शाह आफ्रिदी, शोएब मलिक.
राखीव: खुशदील शहा, शाहनवाज दहानी आणि उस्मान कादीरी.

महत्त्वाच्या बातम्या – 

टी२० विश्वचषकात यंदा पहिल्यांदाच घडणार ‘या’ ५ गोष्टी

टी२० विश्वचषकासाठी उम्रान मलिक भारतीय ताफ्यात सामील होणार, आयपीएलमध्ये विराटलाही केलेले प्रभावित

दुसऱ्या टी२० मध्ये भारतीय महिलांचा पराभव, ऑस्ट्रेलियाने घेतली मालिकेत आघाडी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---