---Advertisement---

सानिया मिर्झाने विचारले, काय मी जाड झालीय का? उत्तर देताना शोएब मलिककडून झाली ‘ही’ मोठी चूक

On: गुरूवार, ऑगस्ट 20, 2020 3:22 PM
---Advertisement---

कोरोना व्हायरमुळे भारताची स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झा तिच्या पती शोएब मलिकपासून जवळपास ७ महिन्यांपासून दूर आहे. सानिया तिचा मुलगा इजहानसोबत हैद्राबादमध्ये राहत आहे, तर पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब त्याच्या परिवारासोबत पाकिस्तानमध्ये राहत होता. काही दिवसांपुर्वी अशी वृत्ते ऐकायला मिळत होती की, शोएब सानियाला भेटण्यासाठी भारतात येणार आहे. पण, पाकिस्तान क्रिकेट संघाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ते शक्य झाले नाही.

अशात, सानिया आणि शोएब सोशल मीडियाद्वारे एकमेकांच्या संपर्कात आहेत. दरम्यान सानियाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन तिचा एक फोटो शेअर केला आहे. तिने आपला फोटो शेअर करत शोएबला विचारले की, मी जाड झाली आहे का? यावर प्रत्युत्तर देताना घाईघाईत शोएबने काही वेगळेच लिहिले. Shoaib Malik Made Mistake While Replying Sania Mirza On Instagram

झाले असे की, सानियाने तिचा पती शोएबला विचारले की, “मी जाड झाली आहे का?” यावर उत्तर देताना शोएबला NO (नाही) लिहायचे होते. पण, किपॅड वरील ऑटो करेक्ट मोडमुळे NO ऐवजी Moooo झाले. शोएबच्या या उत्तराला पाहून सानिया चकित झाली. पण, शोएबने नंतर प्रत्युत्तर देत हे सर्व ऑटो करेक्ट मोडमुळे झाले असल्याचे स्पष्ट केले.

https://www.instagram.com/p/CEBjltNHdZr/?utm_source=ig_web_button_share_sheet

 

नुकत्याच एका मुलाखतीत शोएबने सांगितले होते की, तिचा मुलगा इजहान त्याचे वडील शोएबला भेटण्यासाठी खूप आतुर आहे. पण, शोएब काही दिवसातच सुरु होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेच्या सरावात व्यस्त आहे. २८ ऑगस्टपासून इंग्लंडमध्ये इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात ३ सामन्यांची टी२० मालिका सुरु होणार आहे. शोएब इंग्लंडला पोहोचला आहे. तिथे त्याची २ वेळा कोरोना चाचणी होईल, त्यानंतर तो पाकिस्तान टी२० संघात सामील होईल.

महत्त्वाच्या बातम्या –

सुशांत सिंग मृत्यू प्रकरणावर सुरेश रैनाचे ट्विट, म्हणतोय; भाऊ दुख खूप होतंय, परंतू…

धोनीने कारकिर्दीतील पहीला सामना ज्या खेळाडूंसोबत खेळाला ते सर्व खेळाडू आता कोठे आहेत?

पहिलंच कसोटी शतक मारल्यावर धोनी घेणार होता निवृत्ती, पहा काय होतं नक्की प्रकरण

ट्रेंडिंग लेख –

आयपीएल २०२०: या हंगामातील ३ सर्वात धोकादायक सलामी जोड्या

कसोटी क्रिकेटमध्ये केले मोठे पराक्रम, पण कधीही अव्वल स्थानी न आलेले ४ महान क्रिकेटर

सुरेश रैनाचे ५ मोठे विक्रम जे नेहमीच लक्षात राहतील…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---