इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत एका संघासाठी सर्वात मोठे संकट उभे राहिले आहे. तो संघ म्हणजेच दिल्ली कॅपिटल्स होय. दिल्लीने आतापर्यंत खेळलेल्या पाचही सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या संघाविषयी आता धक्कादायक बातमी समोर येत आहे. दिल्ली संघाच्या खेळाडूंचे सामना चोरीला गेले आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, दिल्लीच्या खेळाडूंच्या किट बॅगमधून 16 बॅट, पॅड्स, थाय पॅड्स, बूट आणि ग्लोव्ह्ज गायब झाले आहेत. दिल्ली संघ शनिवारी (दि. 15 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध खेळण्यासाठी उतरला होता. मंगळवारी (दि. 18 एप्रिल) संघ पुन्हा दिल्लीला पोहोचला.
लाखो रुपये किंमतीच्या बॅट
माध्यमांतील वृत्तांनुसार, ज्या खेळाडूंच्या बॅट चोरीला गेल्या आहेत, त्यात कर्णधार डेविड वॉर्नर (David Warner) याच्या 3, मिचेल मार्शच्या 2, यष्टीरक्षक फलंदाज फिल सॉल्ट याच्या 3 आणि यश धुल (Yash Dhull) याच्या 5 बॅटचा समावेश आहे. मार्श आणि वॉर्नरच्या बॅटची किंमत 1 लाख रुपये आहे. याव्यतिरिक्त इतर खेळाडूंच्या बॅगमधून बूट, ग्लोव्ह्ज आणि क्रिकेटच्या इतर काही गोष्टीही चोरीला गेल्या.
16 bats along with pads, shoes, thigh pads and gloves were stolen from Delhi Capitals' players kit bags. 3 bats belong to David Warner, 2 of Mitchell Marsh, 3 of Phil Salt and 5 of Yash Dhull. (Reported by Indian Express).
— Sharat Chandra Bhatt (@imsbhatt0707) April 19, 2023
दिल्ली कॅपिटल्सने पोलीसात केली तक्रार
खेळाडूंच्या खोलीत जेव्हा किट बॅग पोहोचल्या, तेव्हा त्यांना समजले की, काही सामना गायब झाले आहे. त्यांनी याबाबत फ्रँचायझीला माहिती दिली. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने या चोरीबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. संघाने खेळाडूंनी कसेबसे सराव सत्रात भाग घेतला.
पहिल्यांदाच घडली अशी घटना
प्रत्येक खेळाडू सामना संपल्यानंतर आपले सामान खोलीच्या बाहेर ठेवतो. इथून सामान ट्रान्सिटमध्ये नेले जाते. तिथून पुढे सामान योग्य ठिकाणी पोहोचवले जाते. खेळाडूंना त्यांच्या खोलीच्या बाहेरच या किट बॅग मिळतात. मात्र, ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा ट्रान्सिटमधूनच खेळाडूंचे सामान चोरीला गेले आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा सहावा सामना गुरुवारी (दि. 20 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध दिल्ली येथे खेळला जाणार आहे. (shocking delhi capitals players bats gloves shoes other equipment stolen from kit bag in transit read more)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सामन्यापूर्वी वडील सचिनने दिलेल्या टिप्सचा अर्जुनकडून खुलासा, म्हणाला, ‘आम्ही रणनीती…’
‘या’ युवा खेळाडूचे नशीब फळफळणार! हैदराबादविरुद्धची कामगिरी पाहून रोहितही म्हणाला, ‘तो लवकरच…’