Former West Indies Cricketer Passed Away: क्रिकेट जगतातून वाईट बातमी समोर येत आहे. दिग्गज क्रिकेटपटूने जगाचा निरोप घेतला आहे. या दिग्गजाचे कार अपघातात निधन झाले आहे. दिग्गजाच्या निधनाचे वृत्त समोर येताच, क्रिकेट जगतावर शोककळा पसरली आहे. खरं तर, या दिग्गजाने त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना भारताविरुद्ध खेळला होता. यानंतर त्यांनी निवड समितीचे अध्यक्षही राहिले होते.
कार अपघातात दिग्गजाने गमावला जीव
वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष राहिलेले दिग्गज फिरकीपटू क्लाइड बट्स (Clyde Butts Death) यांचे निधन झाले आहे. गयानाचे माजी कर्णधार आणि वेस्ट इंडिजचे फिरकीपटू शुक्रवारी (दि. 8 डिसेंबर) कार अपघातात मरण पावले. वेस्ट इंडिज क्रिकेटने सोशल मीडियाद्वारे त्यांच्या निधनाची पुष्टी केली.
https://twitter.com/windiescricket/status/1733230950463508530?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1733230950463508530%7Ctwgr%5E09cb2de577a59be663fefbae542f6b0435d4a241%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.indiatv.in%2Fsports%2Fcricket%2Fformer-west-indies-cricketer-clyde-butts-dies-in-car-accident-at-aged-66-2023-12-09-1007112
वेस्ट इंडिजने त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले की, “गयानाचे माजी कर्णधार आणि वेस्ट इंडिजचे फिरकीपटू क्लाइड बट्स यांचे आज सायंकाळी निधन झाले. आम्ही त्यांच्या कुटुंब, मित्र, आणि जवळच्या व्यक्तींप्रती संवेदना व्यक्त करतो. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.”
https://twitter.com/windiescricket/status/1733251651111202950?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1733251651111202950%7Ctwgr%5E09cb2de577a59be663fefbae542f6b0435d4a241%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.indiatv.in%2Fsports%2Fcricket%2Fformer-west-indies-cricketer-clyde-butts-dies-in-car-accident-at-aged-66-2023-12-09-1007112
बट्स यांची कारकीर्द
क्लाइड बट्स (Clyde Butts) हे 1980च्या दशकातील जबरदस्त वेस्ट इंडिज संघात जागा मिळवण्यात यशस्वी राहिले होते. त्यांनी आपल्या गोलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले होते. बट्स यांनी 1985मध्ये कसोटी पदार्पण केले होते. तसेच, 1988मध्ये त्यांनी भारताविरुद्ध अखेरचा सामना खेळला होता. क्लाइड यांनी वेस्ट इंडिजकडून एकूण 7 कसोटी सामने खेळले आणि 10 विकेट्स नावावर केल्या. यादरम्यान त्यांनी 108 धावाही केल्या. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 87 सामने खेळताना 348 विकेट्स घेतल्या होत्या. अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्यांनी 32 सामने खेळताना 32 विकेट्स घेतल्या होत्या.
आणखी एका दिग्गजाचे निधन
वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज जो सोलोमन यांचेही निधन झाले आहे. त्यांनी 93व्या वयात अखेरचा श्वास घेतला. जो सोलोमन यांनी 7 वर्षे संघाचे प्रतिनिधित्व केले. यादरम्यान त्यांनी संघाकडून 27 कसोटी सामने खेळले. यादरम्यान त्यांनी 1 शतक आणि 9 अर्धशतकांच्या मदतीने 1326 धावा केल्या होत्या. (shocking former west indies cricketer clyde butts dies in car accident at aged 66)
हेही वाचा-
अंबानींच्या मुंबईला मागे टाकत दिल्ली कॅपिटल्सने जिंकली बोली! अष्टपैलूसाठी खर्च केले दोन कोटी रुपये
Jio Cinema नाही, तर ‘इथे’ घेऊ शकता IND vs SA टी20 मालिकेचा आनंद, करावा लागणार नाही रुपयाही खर्च