Tom Hoes injury: सध्या इंग्लंडमध्ये ‘द हंड्रेड’ लीगचा पाचवा हंगाम सुरू आहे. 16 ऑगस्ट रोजी नॉटिंघममध्ये ट्रेंट रॉकेट्स आणि सदर्न ब्रेव्ह यांच्यात झालेल्या सामन्यात, इंग्लंड आणि ट्रेंट रॉकेट्स संघाचा खेळाडू टॉम होस क्षेत्ररक्षण करताना गंभीर जखमी झाला. त्याच्या दुखापतीची गंभीरता इतकी होती की त्याला थेट मैदानातून रुग्णालयात न्यावे लागले. (Cricket news England)
या सामन्यात सदर्न ब्रेव्हला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. त्यांच्या डावातील 81 व्या चेंडूवर मायकल ब्रेसवेलने डीप मिड-विकेटच्या दिशेने फटका मारला. त्यावेळी लाँग ऑनवर क्षेत्ररक्षण करत असलेला टॉम होस चेंडू अडवण्यासाठी धावला. याच प्रयत्नात चेंडू सीमारेषा पार गेला, तर टॉम होस स्वतःला थांबवण्याच्या प्रयत्नात घसरला. यावेळी त्याचा उजवा गुडघा आणि टाच पूर्णपणे वाकली. ही दुखापत होताच तो खूप वेदनेत होता, त्यामुळे पंचांनी काही वेळासाठी सामना थांबवला. टॉम होसला तात्काळ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. (Tom Hoes fielding injury)
Adam hose injury while fielding in 100 tournament.Considered one of the terrifying onfield injuries in cricket pic.twitter.com/ZGGA1A52VD
— Special Chai (@Think01King) August 16, 2025
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, ट्रेंट रॉकेट्स संघाने हा सामना जिंकला. सदर्न ब्रेव्हने प्रथम फलंदाजी करताना 100 चेंडूंमध्ये 4 गडी गमावून 140 धावा केल्या होत्या, ज्यात ल्यूस डू प्लॉयने 55 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात, ट्रेंट रॉकेट्सने 96 चेंडूंमध्येच हे लक्ष्य गाठले. त्यांच्याकडून टॉम बेंटनने 49 तर टॉम मूर्सने 55 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. (Trent Rockets vs Southern Brave)






