शनिवारी (९ जानेवारी) महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात हृदय हेलावणारी घटना घडली. भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत १० चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे.
या दुर्दैवी घटनेची बातमी कळताच अवघा देश हादरून गेला. मात्र केवळ देशच नव्हे, तर सीमेपलीकडूनही या घटनेवर शोक व्यक्त करणारी प्रतिक्रिया आली आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने या घटनेवर दु:ख व्यक्त केले. “शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत 10 बाळांना मृत्यू झाल्याची घटना खूपच धक्कादायक आणि दु:खद आहे. पहाटेच्या सुमारास आगीत 10 बाळांना मृत्यू झाल्याचं तेथील डॉक्टरांनी सांगितलंय. दु:खद घटना”, असं ट्विट शोएब अख्तरने केलं आहे.
Very very sad news 😭😭newborn babies died after fire broke out in the Special Newborn Care Unit of a hospital in Maharashtra in the early hours of Saturday, doctors said
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) January 9, 2021
दरम्यान, या घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ माजली असून मुख्यमंत्र्यांनी अधिक तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून मृत बालकांच्या कुटुंबियांना पाच लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
हे तर आठवे आश्चर्य! चक्क मांजरेकरांनी केले जडेजाचे कौतुक, म्हणाले
पुजारा विरुद्ध या रणनीतीने गोलंदाजी केल्याने मिळाले यश, पॅट कमिन्सने केला खुलासा