गुरुवारी आयपीएल 2019मध्ये 51 वा सामना वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद संघात पार पडला. सुपर ओव्हरमध्ये झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने विजय मिळवत प्लेऑफमध्ये प्रवेश केला. आयपीएल 2019 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश करणारी मुंबई इंडियन्स तिसरा संघ ठरला.
मुंबईच्या या विजयात जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्याने महत्त्वाचा वाटा उचलला. हे दोघेही सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. हार्दिक मागील काही सामन्यात गोलंदाजीबरोबरच तुफानी फलंदजीही केली आहे. त्याने या आयपीएल मोसमात सर्वात जलद अर्धशतक करण्याचाही पराक्रम केला आहे. त्यामुळे सध्या प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या मनात तो धडकी भरवत आहे.
याबद्दलच बुमराहने गुरुवारचा सामना संपल्यानंतर हार्दिकला मजेशीर प्रश्न विचारला आहे. या दोघांच्या मुलाखतीचा व्हिडिओ आयपीएलच्या अधिकृत वेबसाईटवर शेअर करण्यात आला आहे.
यात बुमराहने हार्दिकला विचारले की ‘तू चेंडू चांगल्याप्रकारे फटकावत आहेस. त्यामुळे गोलंदाजांनी तूला कुठे चेंडू टाकायचा? तूला गोलंदाजीच न करणे हा चांगला पर्याय आहे का?’
यावर हार्दिकने उत्तर दिले की ‘कदाचित, कदाचित..! मला तसा विचार करायला आवडेल. सर्वकाही चांगले होत आहे. आपले वातावरण चांगले आहे. त्यामुळे आत्मविश्वास मिळतो. मला त्यासाठी मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाचे आभार मानायचे आहेत. विशेषत: माझ्या संघसहकाऱ्यांचे, कारण ते नेहमी माझ्या बरोबर असतात आणि माझ्या कठिण काळतही मला पाठिंबा देतात.’
यानंतर पुन्हा बुमराहने पंड्याला विचारले की ‘जेव्हाही तू मोठे फटके खेळतो तेव्हा तूला दबाव येतो का?’ त्याच्या या प्रश्नावर पंड्याने उत्तर दिले की ‘दबाव येत नाही. माझी मागील कामगिरी मदत करते. मागील खेळींमुळे माझ्यात विश्वास येतो.’
'You have to advise when I go wrong' – Hardik tells Bumrah
Old friends and Super'Over' heroes @hardikpandya7 and @Jaspritbumrah93 have some fun while discussing why @mipaltan were deserving of a play-off spot 💙. By @Moulinparikh #MIvSRH
MUST WATCH 📹 – https://t.co/qzEkNoyAXd pic.twitter.com/Jd9GDaRkTs
— IndianPremierLeague (@IPL) May 3, 2019
या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 162 धावा केल्या होत्या. मुंबईकडून क्विंटन डी कॉकने 58 चेंडूत 69 धावांची खेळी केली. तसेच हैद्राबादकडून खलील अहमदने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद नबी आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
त्यानंतर 163 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या हैद्राबादकडून मनिष पांडेने 47 चेंडूत 71 धावांची खेळी केली. त्याने या सामन्यात हैद्राबादला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर 7 धावांची गरज असताना षटकार मारला. त्यामुळे या सामन्यात बरोबरी झाली आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. यावेळी मुंबईकडून कृणाल पंड्या, हार्दिक आणि बुमराहने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या हैद्राबादकडून पहिल्याच चेंडूवर मनिष पांडे धावबाद झाला. त्याच्यानंतर चौथ्या चेंडूवर बुमराहने मोहम्मद नबीची एक विकेट घेतली. त्यामुळे 4 चेंडूतच हैद्राबादचा डाव 8 धावांवर संपूष्टात आला.
सुपर ओव्हरमध्ये 9 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबईकडून पहिल्याच चेंडूवर हार्दिकने राशिद खानच्या गोलंजदाजीवर लाँगऑफला षटकार मारला. त्यानंतर एक धाव काढली. तिसऱ्या चेंडूवर किरॉन पोलार्डने फटकावलेल्या चेंडूवर दुहेरी धावा निघाल्याने मुंबईने हा सामना सहज जिंकला. तसेच गुणतालिकेत दुसरा क्रमांकही मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या –
–२३ वर्षांपासून लपवलेल्या वयाचा अखेर आफ्रिदीने केला खूलासा…
–पुढील आयपीएल मोसमात धोनी ऐवजी सुरेश रैना करणार सीएसकेचे नेतृत्व?
–दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, रबाडाला परतावे लागणार मायदेशी; जाणून घ्या कारण