सध्या भारत आणि बांगलादेश (India And Bangladesh) यांच्यातील आगामी कसोटी मालिका चर्चेत आहे. ही कसोटी मालिका (19 सप्टेंबर) पासून सुरू होणार आहे, परंतु लिजेंड्स लीग क्रिकेट (LLC) (20 सप्टेंबर) रोजी सुरू होणार आहे. लिजेंड्स लीग क्रिकेटच्या या हंगामात सुरेश रैनापासून ते दिनेश कार्तिक, शिखर धवनपर्यंत सर्वजण या लीगमध्ये खेळताना दिसणार आहेत. दरम्यान, रैनाने एमएस धोनीबद्दल (MS Dhoni) मोठे वक्तव्य केले आहे.
स्टार खेळाडू सुरेश रैनाला (Suresh Raina) अलीकडेच एका मीडिया मुलाखतीत विचारण्यात आले होते की, तुम्हाला एमएस धोनीला लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये खेळताना पाहायचे आहे का? त्यावर उत्तर देताना रैना म्हणाला, “मला या लीगमध्ये धोनीला खेळताना बघायला नक्कीच आवडेल. आयपीएलच्या मेगा लिलावात काय होणार आहे आणि धोनी आणखी किती वर्ष आयपीएलमध्ये खेळण्याचा विचार करत आहे, हे आम्हाला माहीत नाही. हा प्रश्न लिजेंड्स लीग क्रिकेटच्या मालकांना विचारला जावा, ते धोनीशी चर्चा करत असतील.”
यंदाच्या लिजेंड्स लीग क्रिकेट (LLC 2024) मध्ये एकूण 6 संघ खेळताना दिसणार आहेत. त्यामध्ये इंडिया कॅपिटल्स, गुजरात ग्रेट्स, कोणार्क सूर्याज् ओडिशा, मणिपाल टायगर्स, सदर्न सुपरस्टार्स आणि अल्टीमेट तोयम हैदराबाद या संघांचा समावेश आहे. ख्रिस गेल, लेंडल सिमन्स, थिसारा परेरा, मार्टिन गप्टिल आणि मॉन्टी पानेसर यांसारखे दिग्गज विदेशी खेळाडूही या स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“भारतावर भारी पडणार ऑस्ट्रेलिया…” बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीपूर्वी दिग्गजाची मोठी भविष्यवाणी
मात्र 132 धावा दूर! भारताचा ‘हा’ स्टार फलंदाज करणार ‘विश्वविक्रम’
केएल राहुलला संघात स्थान का? भारतीय कर्णधाराने केला मोठा खुलासा