---Advertisement---

श्री मावळी मंडळ ठाणे आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा उद्यापासून.

---Advertisement---

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि श्री मावळी मंडळ, ठाणे यांच्या वतीने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ३ मे ते ६ मे २०१९ या कालावधीत श्री मावळी मंडळ मैदान धोबी आळी  चराई, ठाणे येथे पार पडणार आहे.

यंदा ९४ व्या शिवजयंती उत्सवानिमित्ताने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचा यंदा ६८ वे वर्ष आहे. महाराष्ट्रातील एक लोकप्रिय कबड्डी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. दरवर्षी यास्पर्धेचं दर्जेदार आयोजन करण्यात येत. स्पर्धा यशस्वी करण्याकरिता संस्थेचे सर्व सभासद व खेळाडु अतोनात मेहनत घेत आहेत.

स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार दिनांक ३ मे २०१९ रोजी सायंकाळी ७.३० वाजता मा. श्री. एन. बी. मोटे (उपसंचालक क्रीडा व युवक सेवा मुंबई विभाग) यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून मा. श्री. विनायक कृष्णाजी गोगटे (उद्योगपती) हे उपस्थित राहणार आहेत. तसेच स्पर्धेच्या समारोप व पारितोषिक वितरणाचा सभारंभ सोमवार दिनांक ६ मे २०१९ रोजी रात्रौ ८.०० वाजता मा. कु. कल्पनाराईलकर (संचालक- टीजेएसबी सहकारी बँक लि.) व विषेश अतिथी म्हणून मा. श्री. अजित रानडे (सहायक महाव्यवस्थापक टीजेएसबी सहकारी बँक लि.) यांच्या शुभहस्ते होणार आहे.

या स्पर्धेत पुरुष गटात ४० संघानी व महिला गटात २० संघानी अशा एकूण ६० संघानी सहभाग घेतला आहे. सर्व सामने बाद पध्दतीने खेळण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी मातीची चार क्रीडांगणे तयार करण्यात येणार आहेत. यास्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघास एकूण २,००,००० रुपयांची बक्षिसे व आकर्षक चषक कायमस्वरूपीची पारितोषिके देण्यात येणार आहेत.

Photo Courtesy: Rajesh Mukane

ह्या स्पर्धेत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे व पालघर या जिल्ह्यातील नामवंत संघ सहभागी होणार आहेत. पुरुष गटात गुडमॉर्निंग स्पोर्ट्स क्लब मुं. शहर, बंड्या मारुती सेवा मंडळ मुं. शहर, इच्छाशक्ती क्रीडा मंडळ पालघर, दुर्गामाता स्पोर्ट्स क्लब मुं. शहर, अमरहिंद मंडळ मुं. शहर, जय भारत क्रीडा मंडळ मुं. शहर, उत्कर्ष क्रीडा मंडळ मुं. उपनगर, छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळ ठाणे, टागोर नगर मित्र मंडळ मुं. उपनगर, स्वस्तिक क्रीडा मंडळ मुं. उपनगर, श्री समर्थ क्रीडा मंडळ ठाणे, उजाळा क्रीडा मंडळ ठाणे, हुतात्मा शांताराम क्रीडा मंडळ ठाणे आदी नामवंत संघाचा सहभाग आहे.

Photo Courtesy: Rajesh Mukane

महिला गटात शिवशक्ती क्रीडा मंडळ मुं शहर, विश्वशांती क्रीडा मंडळ पालघर, शिवतेज क्रीडा मंडळ ठाणे, छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळ ठाणे, श्री राम कबड्डी संघ पालघर, संघर्ष क्रीडा मंडळ मुं. उपनगर, स्वराज्य स्पोर्ट्स मुं उपनगर आदी संघानी सहभाग घेतला आहे.

स्पर्धेची कार्यक्रम पत्रिका:

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment