---Advertisement---

RCBला मोठा धक्का..! स्टार खेळाडू स्पर्धेतून बाहेर, ‘या’ खेळाडूला संधी

On: शनिवार, फेब्रुवारी 15, 2025 8:35 PM
Shreyanka Patil
---Advertisement---

महिला प्रीमियर लीगला (Women Premier League) (14 फेब्रुवारी) पासून सुरू झाली. शुभारंभ सामन्यातच गतविजेता संघ बंगळुरू आणि गुजरात या दोन्ही संघात अटीतटीची लढत पाहायला मिळाली. या सामन्यात आरसीबीने ऐतिहासिक विजय मिळवला. तत्पूर्वी बंगळुरूला मोठा धक्का बसला आहे. (14 फेब्रुवारी) पासून सुरू झालेल्या तिसऱ्या हंगामातून श्रेयंका पाटील बाहेर पडली आहे. या हंगामात तिचा आरसीबी संघात समावेश करण्यात आला होता.

परंतु, ती तिच्या पायाच्या दुखापतीतून वेळेवर सावरू शकली नाही. 2024 मध्ये आरसीबीच्या जेतेपदाच्या मोहिमेत श्रेयांकाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. तिने 8 सामन्यात 13 विकेट्स घेत पर्पल कॅपवर आपले नाव कोरले होते.

आशा शोभना आणि सोफी मोलिनेक्स यांच्यानंतर दुखापतीमुळे बाहेर पडणारी श्रेयंका पाटील ही संघातील तिसरी खेळाडू ठरली आहे. केट क्रॉस आणि सोफी डेव्हाईन यांनीही या हंगामात आरसीबीकडून न खेळण्याचा निर्णय घेतला आहे, अशा परिस्थितीत संघाच्या अडचणी वाढल्या आहेत.

श्रेयंका पाटीलच्या जागी अष्टपैलू स्नेह राणाला (Sneh Rana) संघात स्थान देण्यात आले आहे. स्नेहा राणाने गुजरात जायंट्ससाठी महिला प्रीमियर लीगच्या 2 हंगामात 12 सामने खेळले आहेत आणि बेथ मुनी जखमी झाली तेव्हा 2 सामन्यांत तिने गुजरातचे नेतृत्वदेखील केले होते.

महिला प्रीमियर लीग (WPL 2025) मध्ये आरसीबी संघाने शानदार विजयाने सुरुवात केली आहे. स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात रिचा घोषच्या (Richa Ghosh) विस्फोटक खेळीच्या जोरावर आरसीबीने गुजरात जायंट्सचा 6 विकेट्सने पराभव केला. डब्ल्यूपीएलच्या इतिहासात 200 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य गाठणारा आरसीबी हा पहिला संघ बनला आहे.

स्म्रीती मानधनाच्या (Smriti Mandhana) नेतृत्वाखालील आरसीबी संघाला या हंगामातील दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (DC) संघाचे आव्हान असणार आहे. दरम्यान दोन्ही संघातील चुरशीची लढत (17 फेब्रुवारी) रोजी पाहायला मिळेल.

महत्त्वाच्या बातम्या-

क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी आयसीसीनं घेतला मोठा निर्णय
‘हे’ 2 दिग्गज संघ चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर? नेमकं कारण काय?
Champions Trophy; ग्रुप ‘ब’ मधून कोण खेळणार सेमीफायनल? या दोन संघांचा दबदबा!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---