भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू श्रेयस गोपाल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने त्याची प्रेयसी निकिता शिवसोबत साखरपुडा पार केला आहे. श्रेयसने ट्विट करून त्याच्या साखरपुड्याची माहिती दिली होती. राजस्थान राॅयल्स संघानेही या दोघांच्या साखरपुड्याचे ट्विट केले होते. मात्र फार कमी जणांना माहिती आहे की, श्रेयसची होणारी पत्नी निकिता शिव आणि भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल हे फार आधीपासून एकमेकांना ओळखतात.
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज राहुल आणि श्रेयशची होणारी पत्नी निकिता हे चांगले मित्र-मैत्रिण आहेत. राहुल, श्रेयस आणि त्याची होणारी पत्नी निकिता हे बॅंगलोरमध्ये राहतात. हे तिघे नेहमी पार्टीमध्ये भेटत असतात आणि एकमेकांचे वाढदिवसही साजरा करतात.
निकिताने २ वर्षांपूर्वी राहुलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तिने त्याला शुभेच्छा देताना लिहीले होते की, “पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा, मी एवढा साधा आणि नम्र माणूस नाही पाहिला. मी तुला २०१९ च्या विश्वचषकात धमाल करताना बघायला आतुर आहे”
https://www.instagram.com/p/BwjDOPklRSA/?utm_source=ig_web_button_share_sheet
श्रेयसने ट्विटरद्वारे त्याच्या आणि निकिताच्या साखरपुड्याची माहिती दिली होती. त्याने ट्विटमध्ये लिहिले होते की, “तुझ्याशिवाय मागचे काही वर्ष आतासारखे नसते! मी तुझ्यासोबत पुढचे पाऊल टाकण्यासाठी उत्सुक आहे. मी तुझ्यासोबत एकत्र आयुष्य घालवण्यासाठी आतुर आहे. ११.८.२०२१ ”
The past years wouldn't be the same without you!😇
More than excited to be taking this step forward with you. Can't wait to start our lives together ❤️
To us🥂
11.08.2021#engaged #NikisaidYas pic.twitter.com/eBo9um3EDS
— Shreyas Gopal (@ShreyasGopal19) August 12, 2021
आयपीएलमधील संघ राजस्थान राॅयल्सनेही या दोघांना साखरपुड्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या. श्रेयस गोपाल आयपीएलमध्ये राजस्थान राॅयल्स संघासाठी खेळतो. संघाने त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून करत लिहिले होते की, “श्रेयस गोपाल आणि निकिता यांना साखरपुड्याच्या खूप खूप शुभेच्छा.”
She said Shre-Yassss! 💍
Congratulations, @ShreyasGopal19 and Nikitha. 💗#RoyalsFamily pic.twitter.com/k9ovYxVIjY
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) August 12, 2021
गोपालच्या आतापर्यंतच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकायची झाल्यास, त्याने एकूण 47 सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने 48 विकेट्स चटकावल्या आहेत. यात 16 धावांवर 4 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. तर फलंदाजीत त्याने 171 धावा केल्या आहेत. गोपाल 2014 पासून आयपीएलचा भाग आहे. राजस्थान संघाव्यतिरिक्त को मुंबई इंडियन्स संघाकडून खेळला आहे. मात्र गेल्या 7 वर्षांपासून आयपीएलमध्ये खेळत असलेला गोपाल अजून भारतीय संघात जागा मिळवू शकलेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
युवा यष्टीरक्षक ईशानला धोनीकडून शिकायची ‘ही’ गोष्ट, स्वत:च केला खुलासा
रूटची गाडी सुसाट! ९००० कसोटी धावा करताना केली ‘ही’ दैदिप्यमान कामगिरी; तेंडुलकरलाही टाकले मागे
नऊ वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच रूटने केली ‘ही’ खास कामगिरी