Ranji Trophy 2024 : 41 वेळच्या विजेता मुंबई संघासमोर हंगामातील आपल्या दूसऱ्या सामन्यात आंध्र प्रदेशचे आव्हान असणार आहे. सामना शरद पवार क्रिकेट अकादमी, मुंबई या मैदानावर होईल. पहिल्या सामन्यात मोठा विजय मिळवल्यानंतर संघाचा आत्मविश्वास वाढलेला असेल. असे असले तरी, आंध्राला हलक्यात घेऊन चालणार नाही.
मुंबईच्या संघात बदल
दरम्यान, मुंबईच्या संघात बरेच बदल झालेले दिसत आहे. भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर(Shreyas Iyer) या सामन्यात खेळताना दिसेल. तो 2018-19 हंगामापासून पहिल्यांदाच रणजी क्रिकेट खेळणार आहे. तो सरफराज खान याच्या जागी खेळणार आहे. सरफराजची ‘इंडिया ए’ साठी निवड झाली असल्याने त्याला हा सामना खेळता येणार नाही. तुषार देशपांडेही सरफराज सोबत ‘इंडिया ए'(India A) साठी रवाना होईल. तर, शिवम दुबे अफगाणिस्तान विरूद्ध होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय संघाकडून खेळत आहे. त्यामूळे तोही या सामन्याला मुकेल. कर्णधार अजिंक्य रहाणे या सामन्यात खेळमार की नाही याबद्दल अजून शंका आहे. (Shreyas Iyer added to Mumbai squad for match against Andhra Pradesh)
बिहारची उडवली होती दैना
यावर्षीच्या पहिल्या सामन्यात मात्र मुंबईने बिहारला डावाने हरविले होते. आपल्या पहिल्या डावात त्यांनी 251 धावा केल्या होत्या. तसेच, बिहारला त्यांच्या दोन्ही डावांत केवळ 100 धावांवर सर्वबाद करण्याचा पराक्रम त्यांनी केला. मोहित अवस्थीने 27 धावा देत 6 विकेट्स घेतल्या. तर शिवम दूबेने दोन्ही डावात मिळून 6 विकेट्स घेतल्या होत्या.
मुंबई संघ:
अजिंक्य रहाणे (कर्णधार), श्रेयस अय्यर, जय बिस्ता, भूपेन ललवाणी, अमोघ भटकळ, सुवेद पारकर, प्रसाद पवार, हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), शम्स मुलानी, तनुष कोटियन, अथर्व अंकोलेकर, मोहित अवस्थी, धवल कुलकर्णी, रॉयस्टन डायस, सिल्व्हेस्टर डिसूझा.
महत्वाच्या बातम्या –
IND vs AFG । कर्णधार रोहित बनणार सर्वात भारी, कॅप्टन कुलचा मोठा विक्रम निशाण्यावर
IND vs AFG । पहिल्या टी20तून विराटनंतर जयस्वालची माघार, नाणेफेक जिंकून रोहितने घेतली गोलंदाजी






