आगामी टी २० विश्वचषकसाठी भारतीय संघाची घोषणा आयपीएलचा दुसरा टप्पा सुरू होण्याआधी झाली आहे. या संघात ईशान किशन, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांच्यासारख्या खेळाडूंचा सहभाग आहे. या तिघांना भारतीय संघात सामील केले गेले असले तरी, आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात हे खेळाडू खराब फॉर्ममध्ये दिसत आहेत. यामुळे भारतीय संघाची चिंता वाढली आहे. सध्या या खेळाडूंच्या खेळावर सर्वांच्या नजरा टिकल्या आहेत आणि असा अंदाज बांधला जात आहे की, गरज पडली तर, श्रेयस अय्यरला संघात सामील केले गेले जाऊ शकते.
मुंबईचे खेळाडू ठरताहेत अपयशी
ईशान किशन, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या हे तिघेही आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघासाठी खेळतात. आयपीएलच्या मागील हंगामात या खेळाडूंची चांगले प्रदर्शन केले होते. टी२० विश्वचषकासाठी निवड होण्यापूर्वी ईशान आणि सूर्यकुमार या दोघांनी टी२० आणि वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकटमध्ये पदार्पण केलेले आहे. तसेच मुंबई इंडियन्सचाच आणखी एक खेळाडू राहुल चहरनेही वनडे पदार्पण केले. या खेळाडूंनी या सामन्यांमध्ये केलेल्या प्रदर्शनाच्या जोरावर विश्वचषकासाठीच्या संघात स्थान मिळवले आहे. मात्र, आता ते आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात खराब फॉर्ममध्ये दिसत आहेत.
तर श्रेयसचा संघात होऊ शकतो समावेश
बीसीसीआयच्या एका सूत्राने या खेळाडूंच्या फॉर्मविषयी बोलताना म्हटले, “हो ही चिंतेची गोष्ट आहे, पण आयपीएलमध्ये काही सामने बाकी आहेत, ज्यामध्ये आपण त्यांना फार्ममध्ये वापसी करताना पाहू शकतो. आशा आहे की, ईशान वापसी करण्यात यशस्वी राहिल. सूर्यकुमार भारतासाठी धावा करणाऱ्यांपैकी आहे. त्यामुळे काेणती मोठी चिंता नाही. ईशान किशनेही श्रीलंका दौऱ्यावर चांगले प्रदर्शन केले होते. विराटने रविवारी सामन्यानंतर त्याच्याशी चर्चा केली होती.”
सूत्राने पुढे सांगितले की, “आमच्याकडे बॅकअपमध्ये श्रेयस अय्यर आहे. जर काही कमी जास्त झाले तर त्याला मुख्य संघासोबत जोडले जाऊ शकते. मात्र, सध्या याविषयी काही बोलणे घाई केल्यासारखे होईल. ईशान, सूर्यकुमार आणि अन्य ही संघांचे महत्वाचे खेळाडू आहेत. त्यामुळे सध्या अशा शकांना जागा नाही. हार्दिक ठीक होत आहे. तो नेट्समध्ये गोलंदाजी करत आहे. हे एक चांगला संकेत आहे. सध्या त्याच्यासाठी कोणताही बॅकअप नाहीये. शार्दुल आणि दीपक चांगले पर्याय आहेत. पण त्यांना टी२० मध्ये नियमित अष्टपैलूच्या रूपात स्वत:ला सिद्ध करायचे बाकी आहे.”
आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात या खेळाडूंनी केले खराब प्रदर्शन
ईशान किशनने आयपीएलमध्ये मागच्या हंगामामध्ये यूएईत ५७.३३ च्या सरासरीने ५१६ धावा केल्या होत्या. मात्र, या हंगाममध्ये दुसऱ्या टप्प्यात यूएईमध्ये त्याची सरासरी केवळ १३.३७ आहे आणि आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यात त्याने केवळ ११, १४, आणि ९ अशा धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादवचीही परिस्थिती अशीच आहे. आतापर्यंत खेळलेल्या तीन मध्येसामन्यां एकदाही तो दोन आकडी धावसंख्या गाठू शकला नाही आणि केवळ ३, ५ आणि ८ धावा केल्या आहेत. हार्दिकच्या फिटनेसवर अजूनही संशय घेतला जात आहे. राहुल चहर आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात चांगले प्रदर्शन करत होता, पण दुसऱ्या टप्प्यातील तीन सामन्यात त्याने केवळ १ विकेट घेतली आहे.