---Advertisement---

T20 मुंबई लीगमध्ये श्रेयस अय्यरला मिळाली मोठी रक्कम

---Advertisement---

भारतीय संघातुन सध्या खेळत असलेला मुंबईकर श्रेयस अय्यरला मुंबई नाॅर्थ सेंट्रलने ५ लाख रुपयांना संघात घेतले आहे. तो T20 मुंबई लीगमध्ये बोली लागलेला पहीला खेळाडू ठरला आहे. 

सुर्या कुमारला मुंबई नाॅर्थ इस्टने तब्बल ७ लाखांना संघात घेतले आहे. 

आज दूपारी २ वाजता T20 मुंबई लीग लिलावाला सुरूवात झाली. हे लिलाव T20 Mumbai च्या फेसबुक पेजवर चाहत्यांसाठी लाईव्ह करण्यात आले आहेत. 

ह्या स्पर्धेत एकूण ६ संघ सहभागी होणार असून यापुर्वीच संघ मालकांची नावे घोषीत करण्यात आली आहे. 

ही लीग ११ मार्च ते २१ मार्च दरम्यान वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर लगेचच पंधरा दिवसांच्या अंतराने आयपीएललाही सुरुवात होणार आहे.

काल या स्पर्धेतील संघमालकांच्या नावांची घोषणा करण्यात आली. 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर या स्पर्धेचा ब्रॅन्ड अॅंबेसिडर आहे. 

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment