---Advertisement---

बाबो.. ही कसली स्टाईल! टी१० लीगमधील खेळाडूची गोलंदाजी खूपच विचित्र, व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

---Advertisement---

अबू धाबीमध्ये सुरू असलेल्या टी-१० लीगला क्रिकेट चाहत्यांकडून भरघोस प्रतिसाद पाहायला मिळत आहे. या स्पर्धेत जगभरातील दिग्गज खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. यात क्रिस गेल, टॉम बेंटन, निकोलस पुरन यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. १० षटकांच्या या खेळात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळतो. अशातच टी- १० लीग स्पर्धेतील एक गोलंदाजाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. त्याच्या कामगिरीमुळे नव्हे तर त्याच्या विचित्र गोलंदाजी पद्धतीमुळे तो चर्चेत आला आहे.

अजब गोलंदाजी पद्धती

आपणा सर्वांना ऑर्थोडॉक्स गोलंदाजी पद्धती बद्दल माहिती असेल. गोलंदाज फलंदाजाला चकमा देण्यासाठी विशिष्ट पद्धतीने गोलंदाजी करतात, त्यालाच ऑर्थोडॉक्स गोलंदाजी असे म्हणतात. केविन कोथिगोडा या श्रीलंकन फिरकी गोलंदाजाने सर्वच क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आपण जगभरात अनेक गोलंदाज पाहिले असतील ज्यांची गोलंदाजी करण्याची पद्धत ही वेगळी असते. परंतु या फिरकी गोलंदाजाची पद्धत त्यापेक्षाही वेगळी आहे. तो स्वतःच्या फॉलो थ्रोनंतर दोन वेळा पडला आहे.

पॉल एडम्स यांच्यासोबत होतेय तुलना

केविन कोथिगोडा याच्या गोलंदाजीच्या पद्धतीची तुलना दक्षिण आफ्रिका संघाचा माजी गोलंदाज पॉल एडम्स याच्यासोबत केली जात आहे. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा पॉल एडम्स यांच्याच गोलंदाजीला वेगळे म्हटले गेले होते. याचबरोबर भारताचा शिविल कौशिक याची सुद्धा वेगळ्या गोलंदाजी शैलीमुळे चांगलीच चर्चा रंगली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

‘तुम्ही घर चालवण्यासाठी खोट्याची साथ देता’, ‘त्या’ ट्वीटमुळे घेतला जातोय रहाणेचा समाचार

आयपीएल एकत्र खेळतो, परंतु परदेशी खेळाडूंना आमच्या सर्व युक्त्या सांगत नाही- अजिंक्य रहाणे 

‘जॉर्ज फ्लॉईडची हत्या झाल्यानंतर भारतीयांनीही शोक व्यक्त केला’, इरफानच्या ‘याॅर्कर’ ट्विटने वातावरण तापलं

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---