सध्या जारी रणजी ट्रॉफीमध्ये इतिहास रचला गेला आहे. जम्मू-काश्मीरच्या शुभम खजुरियानं महाराष्ट्राविरुद्धच्या सामन्यात द्विशतक झळकावून भारतीय क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला. खजुरिया रणजी ट्रॉफीच्या इतिहासात जम्मू-काश्मीरसाठी द्विशतक झळकावणारा केवळ तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी असा पराक्रम अश्वनी गुप्ता आणि कवलजीत सिंग यांनी केला होता. विशेष म्हणजे, अश्वनी गुप्तानं रणजी ट्रॉफीमध्ये दोनदा द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे.
रणजी ट्रॉफीमध्ये जम्मू-काश्मीरच्या एखाद्या फलंदाजानं तब्बल 22 वर्षांनंतर द्विशतक झळकावण्याचा चमत्कार केला आहे. गेल्या वेळी 2002 मध्ये अश्वनी गुप्तानं बिहारविरुद्ध 203 धावांची नाबाद इनिंग खेळली होती. त्याच्यापूर्वी कवलजित सिंग यानं सर्व्हिसेस विरुद्ध 2001 मध्ये 206 धावा केल्या होत्या. जम्मू-काश्मीरसाठी पहिलं द्विशतक झळकवणारा फलंदाज अश्वनी गुप्ता आहे. त्यानं 1995 मध्ये हिमाचल प्रदेश विरुद्ध नाबाद 210 धावांची खेळी केली होती.
रणजी ट्रॉफीमध्ये जम्मू आणि काश्मीरसाठी द्विशतक झळकावणारे फलंदाज
अश्वनी गुप्ता – विरुद्ध हिमाचल प्रदेश, नाबाद 210, 1995
कवलजीत सिंग – विरुद्ध सर्व्हिसेस, 206, 2001
अश्वनी गुप्ता – विरुद्ध बिहार, नाबाद 203, 2002
शुभम खजुरिया – विरुद्ध महाराष्ट्र, 255, 2024
महाराष्ट्र विरुद्धच्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, 29 वर्षीय शुभम खजुरियानं 353 चेंडूत 255 धावांची खेळी केली. अशाप्रकारे त्यानं एक मोठा इतिहास रचला आहे. वास्तविक, शुभम खजुरिया रणजी ट्रॉफीमध्ये जम्मू-काश्मीरसाठी सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज बनला. त्यानं अश्वनी गुप्ता याचा तब्बल 29 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला. आपल्या या ऐतिहासिक खेळीत खजुरियानं 29 चौकार आणि 8 षटकार मारले.
हेही वाचा –
टीम इंडियात पुन्हा होणार राहुल द्रविडची एन्ट्री? अचानक आले खेळाडूंना भेटायला; धक्कादायक व्हिडिओ समोर
कर्णधारच आहे भारताच्या पराभवाचं कारण, ही चुकी पडली महागात
वर्ल्डकप विजेत्या खेळीपासून मुख्य प्रशिक्षक बनण्यापर्यंत, गौतम गंभीरचं भारतीय क्रिकेटमधील योगदान